Join us

22 वर्षीय पिंकी बुआ उपासना सिंह झाली 42 वर्षाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 14:42 IST

'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या शोमधली पिंकी बुआ म्हणजेच उपासना सिंहने नुकताच आपला 42 वा वाढदिवस  साजरा केला.उपासनाने  आपल्या ...

'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या शोमधली पिंकी बुआ म्हणजेच उपासना सिंहने नुकताच आपला 42 वा वाढदिवस  साजरा केला.उपासनाने  आपल्या बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने फॅमिली मेंबर्स आणि टीव्ही इंडस्ट्रीतील खास मित्रांसाठी खास  पार्टी दिली होती. या पार्टीत राखी सावंत, रतन राजपुत, अयाज अहमद, दीपक तिजोरी हे सेलिब्रिटी कुल अंदाजात दिसले.या रॉकिंग बर्थ डे पार्टीत उपासना गाण्यांवर डान्स करत आपला बर्थ डे फुल ऑन एन्जॉय करताना दिसली.उपासना सिंहने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरही काही फोटो शेयर केले आहेत.विशेष म्हणजे तिच्या बर्थ डे पार्टीला तिचे कुटुंबासह मित्र मंडळी उपस्थित होते. मात्र उपासनाच सिंहचा पती नीरज भारद्वाज या पार्टीत उपस्थित नव्हता. त्यामुळे दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अभिनेता नीरज भारद्वाजसोबत 2009मध्ये उपासनाने लग्न केले होते. मात्र उपासना आणि नीरजचे लग्नानंतर काही वर्षांतच खटके उडायला लागले.त्यामुळे दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.गेल्या काही वर्षापासून उपासना नीरजपासून लांबच राहत आहे.'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या शोनंतर उपासना छोट्या पडद्यावर झळकली नाही. आता 'जुडवा 2' या आगामी सिनेमामध्ये उपासना झळकणार असल्यामुळे ती सध्या या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  पिंकी बुआ बनत 'कॉमेडी नाइटस विथ कपिल' या शोमधून तिने रसिकांचे फुल ऑन मनोरंजन केले. तिने हा शो सोडला असला तरीही आजही उपासना म्हणून नाही तर पिंकी बुआ म्हणून ती लोकप्रिय आहे.उपासनाचा पती नीरज भारव्दाजनेही 'साथ निभाना साथीयाँ' मालिकेत भूमिका साकरली होती.