कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यात चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यातच मराठी कलाकारांच्या बाबतीत तर हे खूप घडतं. अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) नुकतीच 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमात दिसली. शिवाय ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून बाहेर पडल्यानेही चर्चेत होती. २०१५ साली घटस्फोट झाल्यानंतर तेजश्री आजही अविवाहित आहे. तिला नक्की कसा मुलगा हवा यावर तिने नुकतंच एका मुलाखतीत उत्तर दिलं.
तेजश्री प्रधानने सध्या ३६ वर्षांची आहे. तिचा वयाच्या २६ व्या वर्षीच तिचा घटस्फोट झाला. आता तेजश्रीला लग्न करायचं आहे पण तिच्या अपेक्षा आता कमी झाल्या आहेत. मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत तुझा 'पसंदीदा मर्द' कसा आहे असा असं विचारलं असता त्याबद्दल ती म्हणते, "पेन्सिलला शार्प केल्यावर ती टोकदार होते. पण जसीजशी आपण ती वापरु ती बोथट होत जाते. मला वाटतं आयुष्यात त्या पसंदीदा मर्दच्या अपेक्षेबाबतीतही तसंच होतं. पंचविशीत असताना आपल्या बऱ्याच अपेक्षा असतात. असा हवा तसा हवा अमुक हवं ते तमुक हवं. पण नंतर आयुष्य जसंजसं पुढा जातं तेव्हा आता आपल्याला एक खरा माणूस हवा इतकंच उरतं. जो आपल्याशी खरा वागेल आणि शेवटपर्यंत साथ देणारा असेल असा तो हवा. बाकी सब हो जाएगा."
तो मराठी किंवा अमराठी कोणीही चालेल का? यावर ती म्हणाली, "मला मराठी मुलगा मिळालेला आवडेल. पण असं काही नाहीए. प्रेमाची परिभाषा कोणतीही असू शकते."
घटस्फोटानंतर समाजाच्या प्रश्नांचा सामना कसा केलास? तेजश्री प्रधान म्हणाली, "माझ्या आयुष्यात..."
ती पुढे म्हणाली, "माझं मराठी खूप चांगलं आहे. माझं शब्दभांडार खूप आहे. पण जर तुमचा एक मराठी कलाकार आज मराठीव्यतिरिक्त बाकी भाषांवरही प्रभूत्व मिळवत असेल तर त्याचा आदर केला पाहिजे. कलाकाराला भाषेचं बंधन नसतं. मराठी प्रेक्षकांनी याचं कौतुकच केलं पाहिजे की मराठी कलाकार तितकंच छान हिंदीही बोलतो, इंग्लिशही बोलू शकतो."