Join us  

Tara Sutaria-Aadar Jain : कपूर घराण्याची सून होण्याआधी तुटलं नातं, तारा सुतारिया व आदर जैनचं ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 12:03 PM

Tara Sutaria-Aadar Jain : बॉलिवूडमध्ये नाती जमायला आणि तुटायला वेळ लागत नाही. तूर्तास बी-टाऊनमध्ये पुन्हा एका ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडमध्ये नाती जमायला आणि तुटायला वेळ लागत नाही. तूर्तास बी-टाऊनमध्ये पुन्हा एका ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. अर्थात कपलने अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. पण चर्चा जोरात आहे. हे कपल कोण? तर तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि आदर जैन (Aadar Jain). 

होय, तारा व आदर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने ब्रेकअप केल्याचं कळतंय. मात्र त्यावर दोघांपैकी कोणाचीच प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. अनेकदा अशा नात्यांचा शेवट हा कडू असतो. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा आणि आदरने त्यांच्या नात्याचा शेवट गोड करण्याचा निर्णय घेतला.  ब्रेकअपनंतरही दोघांची मैत्री कायम असणार आहे. 

तारा व आदर सर्रास एकत्र दिसायचे.  अगदी कपूर कुटुंबाच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये आदरसोबत तारा दिसायची. अगदी आलिया व रणबीरच्या लग्नातही ताराने हजेरी लावली होती. त्यामुळे हे नातं लग्नापर्यंत पोहोचेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. तारा भविष्यात कपूर कुटुंबाची सून होणार, अशी चर्चा असतानाच तारा व आदरचं ब्रेकअप झालं. 

तुम्हाला ठाऊक आहेच की, आदर जैन हा राज कपूर यांचा नातू आहे. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा तो मुलगा आहे. रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर यांचा तो चुलत भाऊ आहे. त्याने ङऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.  यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची जोरदार चर्चा मध्यंतरी होती.तारा सुतारियाने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘मरजावा’ या चित्रपटातही झळकली. अलीकडे रिलीज झालेल्या ‘एक विलेन रिटर्न्स’मध्ये ती दिसली होती.

टॅग्स :तारा सुतारियाबॉलिवूड