'सैराट' (Sairat) चित्रपट आठवला की, डोळ्यासमोर येतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. चित्रपटातील ही पात्र आणि ती साकारणारे कलाकार तुफान लोकप्रिय ठरले. या ना त्या कारणामुळे सर्वांचीच चर्चा होत असते. या चित्रपटात लगंड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde)ने साकारली होती. तुम्हाला माहित्येय का, त्याला त्याच्या या पहिल्या सिनेमासाठी किती रुपये मानधन मिळाले होते. चला तर मग जाणून घेऊयात.
तानाजी गळगुंडे सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी शेतात काम करता करता कॉलेजला जात होता. 'सैराट'मुळे त्याचं आयुष्य बदलल्याचं तो सांगतो. सैराटनंतरही त्याने आणखी काही सिनेमात काम केलं. त्याला सैराट सिनेमासाठी फक्त २५ हजार रुपये मानधन मिळाले होते. तेदेखील त्याने स्वतःसाठी न वापरता मित्राला दिले. सैराटनंतर मिळालेल्या सिनेमातून त्याने पायाची सर्जरी केली.
सिनेमात येण्यापूर्वी अभिनेता करायचा हे काम
याबद्दल तानाजी गळगुंडे म्हणाला की,"आधी मी वाळू उचलायला जायचो तेव्हा ३०० रुपये मिळायचे. सैराट चित्रपटासाठी मला २५ हजारांचा चेक मिळाला होता. तो मी मित्राच्या नावाने त्याच्याकडे दिला होता. त्यावेळी त्या मित्राला पैशांची खूप गरज होती. ते २५ हजार मी अजूनही त्याच्याकडून परत मागितले नाहीत. सैराट चित्रपटानंतर मला काही चित्रपट मिळाले. पायात गॅप असल्यामुळे त्यावर ८ सर्जरी केल्या. मिळालेल्या पैशातून गावच्या शेतीत सुधारणा केली. आता मला चित्रपटात जरी काम नाही मिळाले तरी गावच्या शेतीत मी काम करू शकतो."
तानाजी नुकताच झाला बाबातानाजी गळगुंडेच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर त्याने त्याची गर्लफ्रेंड प्रतीक्षा शेट्टीसोबत मागील वर्षी गुपचूप लग्न केले. तो ५-६ वर्ष प्रतीक्षासोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. सुरुवातीला त्यांच्या नात्याला आईचा विरोध होता. मात्र नंतर त्यांनी परवानगी दिली. आता नुकतेच या जोडप्याला एक अपत्य झाले आहे.