Join us  

'लस्ट स्टोरीज 2' मधील इंटिमेट सीनवर तमन्ना भाटियाने सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 2:36 PM

 तमन्ना भाटियाने मौन सोडलं असून ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं. 

लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.  तमन्नाचा साऊथ आणि बॉलिवूड दोन्हीकडे मोठा चाहतावर्ग आहे. 'लस्ट स्टोरीज 2' सिरिजसाठी तमन्नाने तिची नो किंसींग पॉलिसीही तोडली होती. यात तिने दिलेले इंटिमेट सीन्स पाहून सगळेच अवाक झाले. अनेकांनी इंटिमेट सीन्स दिल्याने तिला ट्रोलही केलं. यावर आता तमन्ना भाटियाने मौन सोडलं असून ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं. 

तमन्ना भाटिया तिच्या बोल्ड सीनबद्दल म्हणाली,' लोक ज्या पद्धतीने जज करत आहेत हे पाहिल्यानंतर खुप आश्चर्य वाटले.  असे सीन जर पुरुष कलाकारांने केले तर त्याचे कौतुक केले जाते. मात्र मुलींना जज करण्यासाठी लोकांना जराही वेळ लागत नाही. 2023 मध्येही लोकांची मानसिकता अशीच आहे'.

पुढे ती म्हणाली, जर मी सीरियल किलरची भुमिका साकरत असेल तर काय मी लगेच सीरियल किलर होईल का?. तसेच ती म्हणाली, 'हा माझ्यासाठी प्रेक्षकांच्या गरजा पूर्ण करणारी अभिनेत्री होण्याचा एक प्रवास होता.  एक कलाकार म्हणून स्वत:चा शोध घेत आणि वेगवेगळ्या भूमिका करत मी माझ्या कामाचा आनंद घेत आहे'.

बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत पहिल्यांदाच स्क्रीनवर रोमँटिन सीन्स शूट करण्याबद्दल तमन्ना म्हणाली की, विजय वर्माबरोबर सीन शूट करताना मी खूप रिलॅक्स होते. त्याच्याबरोबर खूप कम्फर्ट वाटला. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र काम करताना दिसले होते. एका रिपोर्टनुसार, दोन्ही स्टार्स या मालिकेच्या सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.  तमन्ना आणि विजय वर्मा हे सध्या बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत.  दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. 

टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूडसेलिब्रिटी