Join us  

Taimur Ali Khan Birthday : तैमूरच्या वाढदिवसाला सोहा अली खानची क्युट पोस्ट; तैमूर आणि बहिण इनायाचं कसं आहे नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:23 PM

बॉलिवुड अभिनेत्री करिना कपूरची दोन्ही मुलं नेहमी चर्चेत असतात. आज तैमूर अली खान ६ वर्षांचा झाला आहे.

Taimur Ali Khan Birthday :  बॉलिवुड अभिनेत्री करिना कपूरची दोन्ही मुलं नेहमी चर्चेत असतात. तैमूर आणि जहांगिर या दोघांची नावेच अशी आहेत की दोघेही जन्मत:च चर्चेचा विषय बनले. मात्र दोघेही कॅमेऱ्यासमोर नेहमी फ्रेंडली दिसतात, नखरे करतात आणि नेटकरीही याची मजा घेतात. तर आज तैमूर अली खान ६ वर्षांचा झाला आहे.

तैमूर आणि इनाया बहिण भावाची ही क्युट जोडी

तैमूरच्या वाढदिवसानिमित्त आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सैफ अली खानची बहिण आणि तैमूरची आत्त्या सोहा अली खान हिने एक छान व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोहाची मुलगी इनाया सुद्धा फार क्युट आहे. या व्हिडिओ मध्ये इनाया आणि तैमूरची कशी मस्ती चालते हे दिसत आहे. कधी दोघे चेस खेळत आहेत, तर कधी तैमूर खेळताना इनायाचा पाय खेचून तिला खाली पाडतोय, तर कधी दोघेही वॉकला निघाले आहेत. सोहाने व्हिडिओला भावूक कॅप्शनही दिले आहे. सोहा लिहिते, ' आपल्यात काही महिन्यांचेच अंतर आहे. कधी बॉल तुझ्याकडे आहे तर कधी माझ्या हातात आहे. या रोमांचक आयुष्यात आपण नेहमीच एकमेकांसोबत असू आणि काही ना काही शिकत राहू. हॅपी बर्थडे टीम भाई! इन्नी कडून खूप प्रेम. 

तैमूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सध्या खान कुटुंब सुट्टी एंजॉय करत आहे. करिना सतत सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो अपलोड करताना दिसते. 

टॅग्स :तैमुरकरिना कपूरसोहा अली खानसैफ अली खान सोशल मीडियाइन्स्टाग्राम