Join us

भिडे मास्तरांच्या लेकीचा पार पडला 'रोका'; लाडक्या लेकीने शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 06:46 IST

Jheel mehta: झील लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार असून त्यापूर्वी त्यांचा रोका पार पडला आहे.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. जवळपास १२ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. आतापर्यंत या मालिकेत अनेक कलाकारांची एन्ट्री झाली. तर काही लोकप्रिय कलाकारांनी मालिकेतून एक्झिटही घेतली. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे झील मेहता. भिडे मास्तरांच्या लेकीची भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली झील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच झीलचा रोका सेरेमनी पार पडला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अगदी सुरुवातीच्या काळात झील मेहताने भिडे मास्तरांच्या लेकीची भूमिका साकारली होती. मात्र, काही कारणास्तव तिने ही मालिका सोडली. मात्र, आजही प्रेक्षक तिच्यावर तितकंच प्रेम करतात. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. यातच झीलने तिच्या रोका समारंभाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाचा गोड धक्का दिला आहे. मात्र,आता तिचा होणारा नवरा कोण?  हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. 

झीलचा पार पडला रोका

झील लवकरच आदित्य दुबे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यापूर्वी त्यांचा रोका पार पडला. झीलने तिच्या ब्यूटी बाय मेहता या इन्स्टाग्राम पेजवर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये ती चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे झीलने या कार्यक्रमासाठी तिचा स्वत:चा मेकअप स्वत:चं केला होता.

कोण आहे आदित्य दुबे?

झील आणि आदित्य यांची जुनी मैत्री असून बराच काळ एकमेकांना त्यांनी डेट केलं. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. टाइम्स ऑफ इंडियानुसार, आदित्य दुबे गेमिंग स्टुडिओ बिझनेसमध्ये कार्यरत आहे. तसंच तो व्हिडीओ कंटेट क्रिएशनदेखील करतो.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारसेलिब्रिटी