Join us

तारक मेहतामधील 'हा' अभिनेता आहे दिशा वकानीचा सख्खा भाऊ; तिचे वडीलही झळकलेत मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 08:47 IST

Disha vakani: या मालिकेत दयाबेनच्या म्हणजेच दिशा वकानीच्या सख्या भावाने आणि वडिलांनीही काम केलं आहे. हे फार मोजक्या लोकांना ठावूक आहे.

गेल्या १५ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. उत्तम अभिनयामुळे या मालिकेतील प्रत्येक पात्र गाजलं. त्यातलीच एक भूमिका म्हणजे दयाबेन. अभिनेत्री दिशा वकानीने (Disha vakanI) ही भूमिका अत्यंत सुंदररित्या साकारली. परंतु, गेल्या ३ -४ वर्षांपासून तिने ही मालिका सोडली आहे. परंतु, तिचीी चर्चा आजही होते. विशेष म्हणजे या मालिकेत दयाबेनच्या म्हणजेच दिशा वकानीच्या सख्या भावाने आणि वडिलांनीही काम केलं आहे. हे फार मोजक्या लोकांना ठावूक आहे.

या मालिकेतमध्ये दयाबेनचा भाऊ सुंदरवीरा याने आपल्या मजेशीर स्वभावामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे दयाबेनसोबतच तो सुद्धा लोकप्रिय झाला. परंतु, हाच सुंदरवीरा खऱ्याखुऱ्या आयुष्यातही दिशा वकानीचा भाऊ आहे. मालिकेतील सुंदरचं खरं नाव मयूर वकानी असं असून तोदेखील दिशाप्रमाणेच

सुरुवातीपासून मालिकेत काम करत आहे. इतकंच नाही तर दिशा आणि मयूरसोबतच त्यांच्या वडिलांनी भीम वकानी यांनीही या मालिकेतील एका भागात काम केलं होतं. या मालिकेमध्ये त्यांनी Mavji Chheda ही भूमिका साकारली होती. चंपकलाल गडा यांच्या मित्राच्या भूमिकेत ते झळकले होते दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या एन्ट्रीविषयी एक वक्तव्य केलं ज्यामुळे सध्या या मालिकेतील नवीन दयाबेन कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनसेलिब्रिटी