Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रन लोला रन'च्या रिमेकमध्ये तापसी पन्नू, हे आहे सिनेमाचं टायटल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 17:03 IST

तापसी पन्नू दिसणार जर्मन सिनेमा रन लोला रनच्या रिमेकमध्ये

आगामी काळात अभिनेत्री तापसी पन्नू सिनेमांच्या कामात व्यस्त दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा थप्पड हा चित्रपट रिलीज झाला होता. तसेच तिचा शाबाश मिठ्ठू चित्रपट लाइनमध्ये आहे. त्यानंतर आता तिने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.  जर्मन सिनेमा रन लोला रनचे हिंदी व्हर्जन लूप लपेटामध्ये ती झळकणार आहे.

नवीन प्रोजेक्टची माहिती तापसी पन्नूने इंस्टाग्रामवर दिली आहे. तिने एक पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिले की, माझ्याबद्दल आणखीन एक घोषणा. मी तयार आहे.

तिने सांगितले की, जर्मन सर्वोत्कृष्ट सिनेमा रन लोला रनचा अधिकृत रिमेक सोनी पिक्चर व एलिप्सिस एण्टरटेन्मेंट मिळवून बनवत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आकाश भाटिया करत आहे. या चित्रपटात तापसीच्या अपोझिट ताहिर राज भसीन दिसणार आहे. हा चित्रपट 29 जानेवारी, 2021ला रिलीज होणार आहे.

1998 साली रिलीज झालेला चित्रपट रन लोला रन टॉम टायक्वेरचा थ्रिलर चित्रपट होता. हा सिनेमा व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता. 

लूप लपेटाबद्दल सांगायचं तर दिग्दर्शक आकाश भाटियाने वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. इनसाइड एज असे या वेबसीरिजचे नाव आहे. तापसीचा सहकलाकार ताहिर राजने मर्दानी चित्रपटातून पदार्पण केले होते. तसेच छिछोरेमध्ये झळकला होता.

याशिवाय तो कबीर खानच्या 83 सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

टॅग्स :तापसी पन्नू