Join us
Daily Top 2Weekly Top 5

तापसी पन्नूला करायचेय 'या' महिला क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 10:16 IST

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. नुकतेच तापसी म्हणाली आताच याबाबत काही बोलणं घाईच होईल.

ठळक मुद्देतापसी अनुराग कश्यपच्या वुमनिया या सिनेमात काम करतेय अशी माहिती मिळतेयलवकरच तापसी 'मुल्क' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला  भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. नुकतेच तापसी म्हणाली आताच याबाबत काही बोलणं घाईच होईल. मितालीच्या बायोपिकचे राइट्स मोशन पिक्चर्सने विकत घेतले आहेत. 

मिताली राजने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन बनवले आहेत तसेच ती एकमेव अशी महिला खेळाडू आहे जिने सहा हजार रन्स केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाच्या मेकर्सना सुद्धा यात तापसीला घेण्याची इच्छा आहे. तापसीला जेव्हा या बायोपिकबाबत विचारण्यात आले त्यावेळी ती म्हणाली, अजून सिनेमाची स्क्रिप्ट तयार झालेली नाही त्यामुळे आताच यावर काही बोलता येणार नाही.  आता या सिनेमासाठी डेटा जमा केला जातोय. जर या सिनेमाची ऑफर मला देण्यात तर मी नक्कीच खूश होईन कारण मला ही स्पोर्ट्स बायोपिकमध्ये काम करायचे आहे.  तापसी अनुराग कश्यपच्या वुमनिया या सिनेमात काम करतेय अशी माहिती मिळतेय. हा सिनेमा शार्पशूटरच्या आयुष्यावर आधारित आहे. 

लवकरच तापसी 'मुल्क' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती यात वकीलाची भूमिका साकारणार आहे. तसेच तापसी पहिल्यांदाच ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 'मुल्क' हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. तापसी यात ऋषी कपूर यांच्या सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सामान्य माणसाचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. अनुभव सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे.  नुकताच तापसीचा ‘सूरमा’ रिलीज झाला. या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

टॅग्स :तापसी पन्नू