Join us
Daily Top 2Weekly Top 5

कियारा-सिद्धार्थनंतर तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथिआस बोईसोबत बांधणारा का लग्नगाठ?, अभिनेत्री म्हणाली - माझ्या आयुष्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:23 IST

तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलत असते. मात्र अलीकडेच अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu)गेल्या काही वर्षांपासून बॅडमिंटनपटू मॅथिआस बोई (Mathias Boe)सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ती 9 वर्षांपासून मॅथिआस बोईला डेट करत आहे. तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलत असते. मात्र ती बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते. अलीकडेच अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. 

एका मुलाखतीत तापसीला अलीकडेच लग्नबंधनात अडकलेल्या बॉलिवूड कलाकारांबद्दल विचारण्यात आले. तिचं काही असं प्लॉनिंग आहे का? तापसीने सांगितले की, तिच्या वयाचे लोक ज्यांचे लग्न झाले आहे आणि मुले आहेत त्यांनी मॅथियासला डेट केल्यानंतर त्यांच्या पत्नींना भेटले. त्यांचं नातं स्वीकारायला त्या कधीच मागेपुढे पाहत नाही, असं त्या म्हणाला.

तापसी म्हणाली, “माझ्या वयाच्या लोकांकडे पहा ज्यांचे लग्न झाले आहे आणि मुले आहेत. आमच्या रिलेशनशीपला बराच काळ झाला आहे. आमचं रिलेशनशीप माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातचं सुरु झालं. त्यावेळी जर या गोष्टी समोर आल्या असत्या तर माझ्या कामाबाबत कमी आणि रिलेशनशीपबद्दल जास्त चर्चा झाली असती. 

तापसी पुढे म्हणाली की, असे सांगितल्यावर मला वाटते की प्रत्येकाला माहित आहे की आम्ही ना पीडीएमध्ये आहोत आणि ना आम्ही आमचे नाते स्वीकारण्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही दोघेही आमच्या करिअरच्या दृष्टीने स्वावलंबी व्यक्ती आहोत आणि काम आम्हाला व्यस्त ठेवते. नशीब की आम्ही एकमेकांसाठी वेळ काढतो. माझी कोणासोबत स्पर्धा सुरु नाहीय. ना तर व्यावसायिक किंवा वैयक्तिकरित्या, मी माझ्या आयुष्यात ज्या वेगाने पुढे जात आहे तो माझ्यासाठी सर्वोत्तम आहे.

टॅग्स :तापसी पन्नूसेलिब्रिटी