आयकर विभागाच्या छाप्यामुळे चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. होय, सध्या सोशल मीडियावर तापसीवर सर्वजण कौतुकाचा वर्षाव करत आहे. कारणही तसे आहे. तापसीने एका वयोवृद्ध महिलेला जीवदान दिले आहे.अभिनेत्री तिलोत्तमा हिने एक ट्विट केले आणि तापसीच्या या कौतुकास्पद कामाची चर्चा सुरू झाली. तिलोत्तमाने लिहिले, ‘मी कधी तापसीसोबत काम केलेले नाही. पण ती खूप मेहनती आहे, हे मला माहित आहे. मात्र ती इतकी महान आहे, हे मला माहित नव्हते. तापसीने तिच्या प्लेटलेट्स डोनेट करण्याचे महान काम केले. तापसी तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.’
तापसीने तिलोत्तमाच्या या ट्विटला उत्तर देत लिहिले, ‘ मला एखाद्याचा जीव वाचवण्याची संधी मिळाली असताना मी तो जीव वाचवणार नाही, असे शक्य नाही. माझ्या स्वत:साठीही ही सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि तुझे प्रेम मला असेच मिळत राहो.’तापसी ही तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेली तापसी देशातील विविध राजकीय व सामाजिक मुद्यांवर आपले मत मांडताना दिसते.