Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अजित पवार की देवेंद्र फडणवीस? प्रभावी उपमुख्यमंत्री कोण?" सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 11:40 IST

Khupte Tithe Gupte : सुप्रिया सुळे यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’मधील एक व्हिडिओ समोर आला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. पहिल्या दोन पर्वांनंतर आता तिसऱ्या पर्वालाही पसंती मिळत आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सेलिब्रिटींबरोबरच अनेक राजकीय नेतेही हजेरी लावतात. अवधूत त्याच्या खास शैलीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांना बोलतं करतो. या कार्यक्रमाच्या आगामी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत.

सुप्रिया सुळे यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’मधील एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळत होतं. आता ‘खुपते तिथे गुप्ते’मधील दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अवधूत गुप्ते सुप्रिया सुळेंना उपमुख्यमंत्र्यांबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. “उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहे? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?” असा प्रश्न अवधूत गुप्ते सुप्रिया सुळेंना विचारतो. यावर क्षणाचाही विलंब न करता सुप्रिया सुळे अजित पवारांचं नाव घेतात.

“एक हजारो में मेरी बहना है”, अजितदादांचा Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे

या व्हिडिओमध्ये अवधूत सुप्रिया सुळेंना आणखी एक प्रश्न विचारतो. “कोणत्या पुतण्याचं काकाविरोधातील बंड योग्य होतं असं वाटतं? राज ठाकरे, धनंजय मुंडे की अजित पवार?” असा प्रश्न अवधूत विचारतो. आता या प्रश्नाचं सुप्रिया सुळे काय उत्तर देतात हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सुप्रिया सुळेंआधी ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकलेंनी हजेरी लावली होती. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे हे राजकीय नेत्यांनीही ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :सुप्रिया सुळेअजित पवारदेवेंद्र फडणवीस