Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सनी लियोनचा देसी अवतार करेल घायाळ

By admin | Updated: June 27, 2016 00:40 IST

सनी लियोनीच्या चित्रपटांना यश मिळो ना मिळो, मात्र तिचा फॅशनेबल अंदाज बॉलिवूडच्या मोठमोठ्या नायिकांना वरचढ ठरते.

सनी लियोनीच्या चित्रपटांना यश मिळो ना मिळो, मात्र तिचा फॅशनेबल अंदाज बॉलिवूडच्या मोठमोठ्या नायिकांना वरचढ ठरते. तिला हे चांगल्या प्रकारे माहित आहे की, तिच्या अंगावर कोणत्या प्रकारचे कपडे चांगले दिसतात आणि कोणते नाही. सनीने नेहमी स्वत:ला चांगल्या व आकर्षक रुपात मीडियासमोर प्रस्तुत केले आहे. तरुणी तर तिच्या फॅशनच्या दिवान्या झाल्या आहेत. अलीकडेच सनी पुन्हा नव्या रुपात दिसली. ते म्हणजे तिचे देसी रुप... सनीने टाइट फिटिंग सफेद कुर्ती आणि चूडीदार पायजामा परिधान केला होता. हा सफेद सूटचा फॅबरिक भागलपुरी सिल्क होता, ज्यावर मशीनद्वारे इंबॉयड्री केले होते. निळ्या अनारकली सूट मध्ये सुंदर सनी लियोनने सफेद सूट सोबतच रंगीत दुपट्टा घेतला होता, जो सफेद सोबत खूप मॅच करीत होता. याशिवाय सनीने पर्पल रंगाचे कडे आणि सुंदर झुबके घातले होते.