Join us

सनी लिओनीने पुन्हा केलं लग्न, मुलांच्या साक्षीने घेतली शेवटपर्यंत साथ निभावण्याची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:57 IST

सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांनी २०११ मध्ये लग्न केले होते. आता १३ वर्षांनंतर दोघांनी पुन्हा लग्न केलं आहे

Sunny Leone and Daniel Weber : अभिनेत्री सनी लिओनीने दुसऱ्यांदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. सनी लिओनीने तिचा पती डॅनियल वेबरसोबत मालदीवमध्ये पुन्हा एकदा लग्न केलं आहे.   डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या दुसऱ्यांदा लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सनी लिओनी आणि डॅनियलने पुन्हा एकदा एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेतली. समोर आलेल्या फोटोंमध्ये सनी लिओनी पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये सुंदर दिसतेय. तर डॅनियल वेबरने पांढरा ड्रेस  परिधान केल्याचं पाहायला मिळतंय. सनी लिओनी आणि डॅनियल वेबरसोबत त्यांची मुले निशा, नोआ आणि अशर दिसून येत आहेत. आपल्या आई-बाबांचे लग्न पाहायला मिळाल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. 

 सनी लिओनीने 9 एप्रिल 2011 रोजी डॅनियल वेबरसोबत लग्न केले. शीख रितीरिवाजानुसार पारंपारिक आनंद कारज समारंभात त्यांचा विवाह झाला होता. सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि एकमेकांसोबत ते खूप वेळ घालवतात. अभिनेत्री सनी लिओनीने पहिल्यांदा 2017 मध्ये एका मुलीला दत्तक घेतले आणि त्यानंतर 2018 मध्ये ती सरोगसीद्वारे अशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर या जुळ्या मुलांची आई झाली.

टॅग्स :सनी लियोनीसनी लिओनीमालदीव