Join us  

Koffee With Karan 8 मध्ये येणार तारासिंग, तब्बल १८ वर्षांनी सनी देओल शोमध्ये झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:07 PM

26 ऑक्टोबरपासून 'कॉफी विद करण' चा आठवा सिझन सुरु होतोय.

बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विद करण' (Koffee With Karan 8) हा सर्वात चर्चेतला शो. यामध्ये करण सेलिब्रिटींना बोलवतो आणि त्यांच्या आयुष्यातील सिक्रेट्स उघड करतो. या शोचा आठवा सिझन लवकरच सुरु होत आहे. या सिझनमधल्या जोड्या खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. आलिया भट-करिना कपूर ही नणंद भावजयची जोडी. झीनत अमान-नीतू सिंग या दिग्गज अभिनेत्रींची जोडी. रोहित शेट्टी-अजय देवगण, इतकंच नाही तर करणशी ३६ चा आकडा असलेली अभिनेत्री कंगना रणौत आणि कार्तिक आर्यनचीही चर्चा आहे. तर आता 'गदर 2' मुळे बऱ्याच वर्षांनी बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारा अभिनेता सनी देओलही (Sunny Deol) शोचा भाग असणार असल्याची चर्चा आहे. 

26 ऑक्टोबरपासून 'कॉफी विद करण' चा आठवा सिझन सुरु होतोय. पहिल्या एपिसोडमध्ये मोस्ट ब्युटिफुल कपल रणवीर सिंह-दीपिका पदुकोण झळकणार आहेत. याचा प्रोमोही नुकताच रिलीज झाला आहे. नेहमीप्रमाणेच हा सिझनही गॉसिपने भरलेला असणार यात शंका नाही.

सनी देओलबद्दल सांगायचं तर 2005 साली कॉफी विद करण'च्या पहिल्याच सिझनमध्ये सनी आणि बॉबी देओल ही भावांची जोडी दिसली होती. आता १८ वर्षांनंतर सनी या शोमध्ये दिसणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. सनीच्या 'गदर 2' ने नुकतंच बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातून सनीने पुन्हा आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. करणनेही याची दखल घेत इतक्या वर्षांनी त्याला शोचं आमंत्रण दिलं आहे.

टॅग्स :करण जोहरसनी देओलकॉफी विथ करण 6