बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनिता गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. अनेकदा सुनीताने त्यांच्या नात्याबाबत उघडपणे भाष्यही केलं आहे. आता सुनीताने पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नको असल्याचं म्हटलं आहे. सात जन्म काय तर हा एकच जन्म त्याच्यासोबत पुरेसा असल्याचंही सुनीता अहुजा म्हणाली.
गोविंदाची पत्नी सुनीताने पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "गोविंदा हिरो आहे. हिरो लोक पत्नीपेक्षा जास्त हिरोईनसोबत त्यांचं आयुष्य घालवतात. शूटिंगसाठी ४० दिवस बाहेर असतात. माझी मुलं तेव्हा छोटी होती त्यामुळे सासूसोबत मी घरी असायचे. हिरोची पत्नी व्हायचं असेल तर तुम्हाला स्ट्राँग राहावं लागतं. तुमचं हृदय दगडाचं करून जगावं लागतं. लग्नाच्या ३८ वर्षांनी मला याची जाणीव होतेय. गोविंदा खूप चांगला माणूस आणि भाऊ आहे. पण, तो एक चांगला पती नाही होऊ शकत. त्यामुळे मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय. मी हे याआधीही सांगितलंय की गोविंदा तू पुढच्या जन्मी माझ्या पोटी जन्म घे, पण पती नको होऊस. सात जन्म काय, त्याच्यासोबत हा एकच जन्म पुरेसा आहे".
इमोशनल आणि फिजिकल चिटिंगवरही तिने भाष्य केलं. "इमोशनल चिटींग सगळ्यात वाईट आहे. तुम्ही एका व्यक्तीवर प्रेम करता आणि नंतर तुम्ही त्याला चीट करता हे बरोबर नाही. मी खूप इमोशनल आहे. मी गोविंदावर मरेपर्यंत प्रेम करेन. पण, इमोशनली मला कोणीही धोका दिला तर मला खूप वाईट वाटेल. इमोशनल आणि फिजिकल कोणत्याच प्रकारे चीट नाही केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पत्नीला का फसवता? जेव्हा एखाद्या महिलेच्या डोळ्यात अश्रू येतात तिच्या मनातून श्राप निघतात तेव्हा माणूस उद्ध्वस्त होतो", असंही ती म्हणाली.
Web Summary : Sunita Ahuja stated that Govinda is good as a brother but not as a husband. She doesn't want him as a husband in her next life. Emotional cheating is worst, she added.
Web Summary : सुनीता आहूजा ने कहा कि गोविंदा एक भाई के रूप में तो अच्छे हैं, लेकिन पति के रूप में नहीं। वह अगले जन्म में उन्हें पति के रूप में नहीं चाहतीं। भावनात्मक धोखा सबसे खराब है, उन्होंने कहा।