Join us  

Hrishikesh Shelar :'सुंदरा मनामध्ये भरली' फेम दौलतराव झाला बाबा; सोशल मीडियावर दाखवली बाळाची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:00 AM

दौलत रावांच्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. गोंडस बाळाची पहिली झलक दाखवताना अभिनेत्याने फार सुंदर कॅप्शन लिहिलं आहे.

कलर्स मराठी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhye Bharali) ही  मालिका जितकी लोकप्रिय झाली आणि तितकेच मालिकेतील कलाकारही लोकप्रिय झालेत. या  मालिकेतला दौलत (Daulat ) आठवतं असेलच. नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या दौलतला तर या भूमिकेने नवी ओळख दिली. हाच दौलत बाबा झाला आहे. दौलतची भूमिका साकारणारा अभिनेता हृषिकेश शेलार(Hrishikesh shelar)नं बाबा झाल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. 

हृषिकेश शेलारच्या पत्नीनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 'इट्स अ बेबी गर्ल... मेरी जान... फिलिंग बाप'. असं कॅप्शन देत त्याने छोट्या परीचं झलक दाखवली आहे. अनेक सेलिब्रेटींनी हृषिकेशच्या पोस्टवर कमेंट करत अभिनंदन केलं आहे.  

याआधी हृषिकेशने प्रेग्नंट बायकोसोबत मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं.  या फोटोत हृषिकेशची बायको स्रेहा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली होती. हृषिकेची बायको बायकोचे नाव स्नेहा अशोक मंगल (काटे)असं आहे. ती सुद्धा अभिनेत्री आहे तिने अनेक नाटकांमधे काम केले आहे . ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या मालिकेत स्रेहाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

‘लक्ष्मी सदैव मंगलंम’ या मालिकेतून ऋषिकेशने आपल्या करियरची सुरुवात  केली होती. या मालिकेत त्याच्यासोबत समृध्दी केळकर दिसली होती. त्यानंतर त्याने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम केलं.  ‘शांतेचे कार्ट चालू आहे’ या नाटकांतही त्याने काम केलं आहे.

 

टॅग्स :टिव्ही कलाकारकलर्स मराठी