Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुहाना उत्तम अभिनेत्री बनेल- शबाना आझमी

By admin | Updated: May 29, 2017 16:02 IST

अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. तीच्या बॉलिवूड डेब्युबद्दलसुद्धा विविध चर्चा सुरू आहेत. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीच सुहानाचं कौतुक होऊ लागलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29
अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. तीच्या बॉलिवूड डेब्युबद्दलसुद्धा विविध चर्चा सुरू आहेत. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीच सुहानाचं कौतुक होऊ लागलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सुहाना एक उत्तम अभिनेत्री होऊ शकते, असं मत व्यक्त केलं आहे. शबाना आझमी यांनी ट्विटरवरून सुहाना खानचं कौतुक केलं आहे..
‘माझे शब्द लक्षात ठेव सुहाना खान ही पुढे जाऊन एक चांगली अभिनेत्री होणार. मी तिचे काही व्हिडिओ बघितले आहेत. तिने खूप छान अभिनय केलाय,’ असं शबाना आझमी यांनी ट्विट केलं आहे. 
 
 
 
 
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानचीसुद्धा शबाना आझली यांनी एकेकाळी प्रशंसा केली होती. आमिर बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने एक शॉर्टफिल्म केली होती. ही शॉर्फफिल्म फार कमी लोकांनी पाहिली होती. ही शॉर्टफिल्म पाहिलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी एक शबाना आझमी या एक होत्या. त्यावेळी तो एक चांगला अभिनेता होणार, असं शबाना यांनी म्हटलं होतं. आमिर नंतर शबाना आझमी यांनी केलेल्या सुहाना हिच्या केलेल्या प्रशंसेमुळे सुहानादेखील बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री होइल, अशी चर्चा सिनेवर्तुळात सुरू झाली आहे.