Join us

सुहाना खान अभिनयाव्यतिरिक्त या क्षेत्रात करणार पदार्पण, किंग खानच्या लेकीनं केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 18:48 IST

Suhana Khan : अभिनेत्री सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan)ची दोन मुलं सुहाना (Suhana Khan) आणि आर्यन (Aaryan Khan) इंडस्ट्रीत आपला नवा प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. एकीकडे आर्यन खान अभिनयापासून दूर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असताना दुसरीकडे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहाना खान अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांच्यासोबत ती झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या नेटफ्लिक्स चित्रपटात तिचे अभिनय कौशल्य दाखवणार आहे. आता अलीकडेच सुहाना खानने तिच्या चाहत्यांना सांगितले की, ती केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर गायिका म्हणूनही तिचा नवीन प्रवास सुरू करणार आहे.

सुहाना खानच्या व्हायरल क्लिपमध्ये तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांनी याआधीच पाहिली आहे, पण कदाचित ही पहिलीच वेळ असेल जेव्हा चाहते तिला गाणे गाताना पाहतील. सोमवारी सुहाना खानने स्वतः गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केल्याची माहिती तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीजमध्ये सुहाना खान केवळ तिचे अभिनय कौशल्य दाखवणार नाही, तर तिच्या पहिल्याच चित्रपटात तिला तिची गायन कौशल्या चाहत्यांना दाखवण्याची संधीही मिळाली आहे. तिने 'द आर्चीज'मधील 'जब तुम ना थी' या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. हे गाणे शाहरुख खान आणि गौरी खानच्या लाडक्या मुलीने स्वतःच्या आवाजात गायले आहे.

या गाण्याचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर करताना सुहाना खानने लिहिले की, "मी माझे पहिले गाणे गायले आहे. माझ्यासोबत इतका संयम बाळगल्याबद्दल झोया अख्तर आणि शंकर महादेवनचे खूप खूप आभार. कृपया ते दयाळूपणे ऐका. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा व्यतिरिक्त, वेदांग रैना, मिहिर आहुजा, अदिती डॉट आणि युवराज मेंडा ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या 'द आर्चीज' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. झोया अख्तर दिग्दर्शित आर्चीज ७ डिसेंबर २०२३ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानआर्यन खान