Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध भावे 'फुलराणी' चित्रपटात दिसणार वेगळ्या भूमिकेत, मोशन पोस्टर केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 11:39 IST

आज सुबोध भावेचा वाढदिवस असून त्याने त्याच्या वाढदिवसादिवशी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आज सुबोध भावेचा वाढदिवस असून त्याने त्याच्या वाढदिवसादिवशी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे फुलराणी.सुबोध भावेने इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहेत.  या चित्रपटात सुबोध भावे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 

सुबोध भावेने इंस्टाग्रामवर फुलराणी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत लिहिले की, 'फुलराणी' या माझ्या नवीन चित्रपटामध्ये आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या! कोरोनाचे सर्व नियम पाळून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे खूप समाधान आहे. २०२२ मध्ये आधी चित्रपटगृहांत आणि मग बाकी माध्यमांतून 'फुलराणी' प्रदर्शित करायचा मानस निर्मात्यांनी आणि फुलराणीच्या सर्व टीमने केला आहे. फुलराणीचे पहिले मोशन पोस्टर खास तुमच्यासाठी!

सुबोध भावेने आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक खास स्थान निर्माण केले आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहे. त्याने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सुबोध भावे आपल्या ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेची निर्मिती केली आहे. फुलराणी व्यतिरिक्त मानापमान, वर्तमान आणि विजेता या चित्रपटात तो झळकणार आहे.
टॅग्स :सुबोध भावे