Join us  

ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाली 'ही' स्टारकिड, तरीही मिळाला सिनेमा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 12:08 PM

सध्या या स्टारकीडच्या सौंदर्याची खूपच चर्चा आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या कलाकारांपेक्षा स्टारकीड्सचीच अधिक चर्चा आहे. अनेक स्टारकीड्स इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत. यामुळे नेपोटिझमचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातच आता एक स्टारकीड ऑडिशनमध्ये रिजेक्ट होऊनही तिला आता सिनेमा मिळाला. याचा खुलासा तिने स्वत:च केला आहे. कोण आहे ती स्टारकीड?

९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री रवीना टंडनची (Raveena Tandon) लेक राशा थडानी (Rasha Thadani) सध्या चर्चेत आहे. राशा लवकरच अभिनयात पदार्पण करणार आहे. तिच्या सौंदर्यावर चाहते आतापासूनच फिदा झालेत. तसंच कॅमेऱ्यासमोर राशाचा आत्मविश्वास नेहमीच वाखणण्याजोगा असतो. नुकतंच राशाने कॉस्मोपॉलिटियनला दिलेल्या मुलाखतीत पहिला सिनेमा कसा मिळाला याचा खुलासा केला. ती म्हणाली, " गट्टू सर म्हणजेच अभिषेक कपूर कोणालाही असंच सिनेमात घेतील असं अजिबातच नाही. मी सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. माझी ऑडिशन इतकी वाईट गेली की मी सांगूही शकत नाही. पण अभिषेक कपूर यांनी कदाचित माझ्यात काहीतरी पाहिलं ज्यामुळे त्यांनी मला सिनेमात घेतलं."

ती पुढे म्हणाली, "त्यांनी मला संधी दिली आहे. त्यामुळे मी सुद्धा स्वत:ला नक्कीच सिद्ध करेन. मी त्यांना निराश होऊ देणार नाही. सिनेमा मिळाला याचा मला खूप आनंद आहे. हा माझा पहिलाच सिनेमा असल्याने मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते. अभिषेक सर अनेक उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. "

माध्यम रिपोर्टनुसार, राशा थडानी या सिनेमातून अजय देवगणचा भाचा अमन देवगणसोबत इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. सिनेमाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. राशा नुकतीच ग्रॅज्युएट झाली असून तिने अभिनेत्री होण्याचं ठरवलं आहे. तर दुसरीकडे तिची आई रवीना टंडननेही जबरदस्त कमबॅक करत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. मायलेकी सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडरवीना टंडनसिनेमा