Join us

स्पृहाचा ग्लॅमर लुक

By admin | Updated: October 13, 2016 02:54 IST

आपल्या अभिनयाने आणि कवितांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो अपलोड

आपल्या अभिनयाने आणि कवितांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमधील तिचा लुक खूपच ग्लॅमरस दिसतो आहे. तिचा हा हटके लुक पाहून तिचे चाहतेदेखील अवाक झाले आहेत. पण तिच्या या बोल्ड लुकला चाहत्यांनी भरभरून लाइक्स दिले आहेत. तर काहींनी दिल छू लिया म्हणत स्पृहाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. स्पृहाने या फोटोचे श्रेय विनायक कुलकर्णीला दिले आहे. मात्र, स्पृहाने हा फोटो सहज काढला आहे की कोणत्या चित्रपटासाठी हे अजून कळलेले नाही.