Thalapathy Vijay CM Oath : तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयानंतर आज चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी अभिनेत्री तृषा कृष्णन हिची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
निळ्या रंगाच्या सुंदर साडीत तृषा कृष्णन समारंभाला उपस्थित राहिली होती. कार्यक्रमादरम्यान तिने विजय यांच्या आईशोभा चंद्रशेखर यांची भेट घेत त्यांना प्रेमाने मिठी मारली. दोघींच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तृषा कृष्णनसोबत तिची आई उमा कृष्णनदेखील उपस्थित होत्या.
तृषा कृष्णन व जोसेफ विजय हे एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा सुरू आहेत. अभिनेत्याच्या पत्नीने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल करताना त्याचे लोकप्रिय अभिनेत्रीसह विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. परंतु, दोघांनीही अद्याप याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजयचे अभिनेत्री तृषा कृष्णनबरोबर अफेअर असल्याचे अनेक महिन्यांपासून म्हटले जाते आहे.
Web Summary : Actress Trisha Krishnan attended Thalapathy Vijay's swearing-in as Tamil Nadu CM. She warmly greeted Vijay's mother, Shobha, sparking relationship rumors amid Vijay's divorce proceedings. The actress was accompanied by her mother, Uma Krishnan.
Web Summary : अभिनेत्री तृषा कृष्णन ने तमिलनाडु के मुख्यमंत्री के रूप में थलापति विजय के शपथ ग्रहण समारोह में भाग लिया। उन्होंने विजय की माँ, शोभा को बधाई दी, जिससे विजय के तलाक की कार्यवाही के बीच रिश्ते की अफवाहें उड़ीं। अभिनेत्री के साथ उनकी माँ, उमा कृष्णन भी थीं।