Join us

त्रिशा कृष्णननं 'Thug Life' चित्रपटातील कमल हासनसोबतच्या रोमान्स सीनवर सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:27 IST

'ठग लाइफ' या आगामी सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे.

Thug Life : सुपरस्टार कमल हसन (Kamal Haasan) यांचा आगामी सिनेमा 'ठग लाईफ' (Thug Life) सध्या चर्चेत आहेत. नुकताच 'ठग लाईफ'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला.  ट्रेलर रिलीज होताच कमल हसन आणि त्रिशा कृष्णन यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कमल हसन यांचा त्रिशा कृष्णनसोबतचा रोमँटिक सीन सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या सीनवर संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. काहींनी ट्रोल केलंय तर काहींना या जोडीला पुन्हा एकत्र पाहून आनंद झालाय. यातच आता अभिनेत्रीनं कमल हासनसोबतच्या रोमान्सवरून होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे.

कमल हसन ७० वर्षांचे आहेत. तर त्रिशा ४२ वर्षांची आहे. दोघांमध्ये तब्बल ३० वर्षांचं अंतर आहे. त्यामुळं या दोघांमध्ये इंटिमेट सीननं सर्वांची झोप उडवली आहे. अलिकडेच मुंबईत झालेल्या चित्रपटाच्या रिलीजपूर्व कार्यक्रमात त्रिशानं इंटिमेट सीनवर भाष्य केलं. ती म्हणाली, "जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हाचं मला माहिती होतं की हे जादुई असणार आहे. तेव्हा मी तो साइनही केलेला नव्हता आणि मी चित्रपटाचा भागही नव्हते".

त्रिशाने मणिरत्नम आणि कमल हासन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. ती म्हणाली, "ते दोघं सेटवर इतक्या सुंदर पद्धतीने काम करत होते की, आमचं सगळ्यांचं लक्ष फक्त त्यांच्याकडेच जात होतं. त्यांना पाहून आम्हाला वाटलं, अरे बापरे, आता आपण खरंच काम करायला हवं!".

'ठग लाईफ' हा चित्रपट गँगस्टरच्या प्रवासावर आधारित असून मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यात कमल हसन आणि सिलंबरासन मुख्य भूमिकेत आहेत.  तर त्रिशा कृष्णन, सान्या मल्होत्रा, अभिरामी, अशोक सेल्वन, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज, नासेर, अली फजल, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ आणि वैय्यापुरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सिनेमा आता येत्या ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. थिएटरमधील ८ आठवड्यांच्या प्रदर्शनानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :कमल हासनसेलिब्रिटी