Join us  

कुटुंबवत्सल, प्रेमळ अन् अँग्री यंग मॅन..; विजय-मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार'चा खास ट्रेलर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 1:38 PM

विजय देवराकोंडा - मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीने लक्ष वेधलेलं दिसतंय

सध्या साऊथच्या सिनेमांची चांगलीच हवा आहे. काही दिवसांपुर्वी विजय देवराकोंडाच्या 'द फॅमिली स्टार' सिनेमाचा टिझर रिलीज झाला. छोट्याश्या टिझरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. आता नुकतंच सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमधून विजय देवराकोंडा आणि मृणाल ठाकूरची खास केमिस्ट्री पाहायला मिळतेय. शिवाय मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी सिनेमात विशेष भूमिकेेत झळकत आहेत.

'द फॅमिली स्टार' चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 26 सेकंदांचा आहे. ट्रेलरमध्ये बघायला मिळतं की, विजय हा एक कुटुंबवत्सल माणूस दिसतोय. त्याच्या आयुष्यात मृणाल येते. मृणाल ही एक भाडेकरु असते. अचानक ट्विस्ट अँड टर्न येतात आणि विजय गुंडांना लोळवताना दिसतो. या चित्रपटात रोमान्स, ड्रामा, ॲक्शन आणि कॉमेडीचाही भरपूर डोस असणार आहे. 

2018 च्या ब्लॉकबस्टर 'गीता गोविंदम' नंतर विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक परशुराम पेटला 'द फॅमिली स्टार'मध्ये दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट एक ॲक्शन एंटरटेनर असल्याचे मानले जाते. ज्यामध्ये विजय आणि मृणाल व्यतिरिक्त जगपती बाबू, अच्युथ कुमार, अभिनय, वासुकी, रोहिणी हट्टंगडी आणि रवी बाबू, दिव्यांश कौशिक, अजय घोष आणि इतर अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 'द फॅमिली स्टार' 5 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडामृणाल ठाकूरTollywood