Join us

न्यूड सीनसाठी तीन दिवस उपाशी राहिला हा अभिनेता, शूटआधी प्यायला 30ml वोडका, अशी झाली होती अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:51 IST

या अभिनेत्याने सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे.

अभिनेता पृथ्वीराज सुकुमार याचा आडू जीवनम द गोट लाइफ या दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. अभिनेत्याने ज्या प्रकारे स्वत:ला व्यक्तिरेखेत साचेबद्ध केले आहे तेही कौतुकास्पद आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पृथ्वीराज याने अनेक आव्हानेही पार केली. तीन दिवस उपाशी राहिला. नुकताच सिनेमॅटोग्राफरने याचा खुलासा केला आहे.

२८ मार्च रोजी रिलीज झालेल्या गोट डेजवर आधारित आडू जीवनमने पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर ३५ कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आठवड्याच्या दिवसातही या चित्रपटाची क्रेझ संपलेली नाही. दरम्यान, चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर सुनील केएस यांनी एका मुलाखतीत पृथ्वीराजच्या न्यूड सीनच्या चित्रीकरणामागील कथा सांगितली आहे.

शूटच्या तीन दिवस आधी खाणे-पिणे बंद केलेद गोट लाइफमध्ये पृथ्वीराज सुकुमारनचा न्यूड सीन आहे. हा सीन करण्यासाठी अभिनेत्याने तीन दिवस उपास केला होता. पाणीदेखील प्यायला नव्हता.. त्याच्या शरीरातील पाणी काढून टाकण्यासाठी, त्याने शेवटच्या दिवशी ३० मिली पर्यंत वोडका प्यायला. सुनीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. क्रिस्टोफर कनागराज यांनी X वर त्याचा व्हिडिओ शेअर करताना सुनीलच्या वक्तव्याचा अनुवाद केला आहे.

अभिनेत्याला चालताही येत नव्हतेव्हिडीओसोबत क्रिस्टोफरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "वाह, पृथ्वीराजने न्यूड सीनसाठी तीन दिवस उपवास केला होता. शेवटच्या दिवसापर्यंत तो पाणीही प्यायला नव्हता. शूटिंगपूर्वी त्याने ३० मिली वोडका प्यायला ज्यामुळे पाणी निघून जाईल. त्याला चेअरवरुन लोकेशनवर नेले होते. पशूटच्या आधी त्याला खुर्चीवरून उचलावे लागले."

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँमध्ये पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदला म्हणजेच १० एप्रिलला प्रदर्शित होत आहे.