Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा हेगडेचे भाकीत ठरले खरे! अभिनेत्रीने शेअर केला थलापती विजयचा 'तो' व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 14:23 IST

थलापती विजय मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत पूजा हेगडेने आधीच दिले होते? व्हिडीओ व्हायरल

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या 'तमिळगा वेटी कळघम' (TVK) पक्षानं मे २०२६ मधील विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरून कोणाशीही युती न करता, स्वबळावर विजयने ही निवडणूक लढवून मोठे यश मिळवले आहे. हे यश पाहता विजय हा तमिळनाडूचा पुढील मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विजयच्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्री पूजा हेगडे हिने शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

पूजा हेगडेने तिच्या इंस्टाग्रामवर विजयसोबतच्या आगामी 'जना नायगन' चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मागे एक व्हाईटबोर्ड दिसत असून त्यावर "निवडणूक कोण जिंकणार?" असा प्रश्न लिहिलेला आहे. व्हिडीओमध्ये पूजा त्या बोर्डकडे आणि नंतर तिथेच उभ्या असलेल्या विजयकडे बोट दाखवते. हा व्हिडीओ शेअर करताना पूजाने कॅप्शन दिले की, "वाटतंय की मी आधीच भविष्यवाणी केली होती? विजय सर, तुमची स्वप्ने पूर्ण होवोत". पूजाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

विजयच्या दणदणीत विजयानंतर केवळ पूजाच नाही, तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले आहे. यामध्ये रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, ममूटी, धनुष, रश्मिका मंदाना, विजय देवराकोंडा, नानी आणि काजल अग्रवाल यांसारख्या बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

'जन नायगन'ची प्रतीक्षा वाढली

चाहते आता विजयच्या 'जन नायगन' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट विजयचा शेवटचा चित्रपट मानला जात आहे. खरं तर हा चित्रपट जानेवारीमध्येच प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर बोर्डाच्या (CBFC) प्रमाणपत्राअभावी तो पुढे ढकलण्यात आला. आता विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या तयारीसोबतच या चित्रपटाची चर्चाही जोरात सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pooja Hegde's prediction comes true! Actress shares Vijay's video.

Web Summary : Thalapathy Vijay's party secured a historic win in Tamil Nadu's elections. Pooja Hegde shared a video from their film set, hinting at Vijay's victory. Celebrities congratulated Vijay, and anticipation grows for his film 'Jana Nayakan'.
टॅग्स :थलपती विजयपूजा हेगडे