Tamil Nadu Cm Vijay : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून १० मे रोजी शपथ घेतल्यानंतर अभिनेते आणि राजकारणी जोसेफ विजय यांनी प्रशासकीय कामाचा वेग वाढवला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांची सध्या देशभर चर्चा होत आहे. ७१७ दारूची दुकाने बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर, आता त्यांनी सिनेरसिकांसाठी आणि विशेषतः अभिनेत्री तृषाच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत विजय यांनी चित्रपटसृष्टीशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला. सूर्या आणि तृषा कृष्णन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'करुप्पू' या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या १४ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या शोसाठी त्यांनी विशेष परवानगी दिली आहे. तामिळनाडूमध्ये पहाटेचे आणि सकाळी ९ वाजण्यापूर्वीचे शो दाखवण्यावर कडक निर्बंध आहेत, मात्र, या चित्रपटाची क्रेझ पाहता सरकारने ही सवलत दिली आहे.
२१ वर्षांनंतर सूर्या-तृषाची जोडी पडद्यावर
'करुप्पू' चित्रपटाच्या निमित्ताने सूर्या आणि तृषा तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. यापूर्वी २००५ मध्ये ते 'आरू' चित्रपटात दिसले होते. नव्या चित्रपटात तृषा एका वकिलाची भूमिका साकारत आहे, तर सूर्या 'करुप्पूस्वामी' या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल ४.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सकाळी ९ वाजताच्या शोसाठी परवानगी का लागते?
तामिळनाडूमध्ये मोठ्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चाहत्यांची प्रचंड गर्दी होते. २०२३ मध्ये पोंगलच्या वेळी 'थुनाइवू' आणि 'वारिसू' या चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पहाटेचे शो बंद केले आहेत. आता सकाळी ९ च्या शोसाठीही सरकारची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागते, जी मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी 'करुप्पू'ला दिली आहे.
Web Summary : Tamil Nadu's new CM Vijay, after banning liquor shops, allowed a 9 AM screening of 'Karuppu,' starring Surya and Trisha, waiving restrictions due to high fan demand. The film marks their reunion after 21 years.
Web Summary : तमिलनाडु के नए मुख्यमंत्री विजय ने शराब की दुकानों पर प्रतिबंध के बाद, सूर्या और तृषा अभिनीत 'करुप्पू' की सुबह 9 बजे की स्क्रीनिंग की अनुमति दी, प्रशंसकों की उच्च मांग के कारण प्रतिबंधों को माफ कर दिया। यह फिल्म 21 साल बाद उनके पुनर्मिलन का प्रतीक है।