Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री बनल्यानंतर थलापती विजयचा 'जन नायगन' प्रदर्शनासाठी सज्ज; निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:33 IST

विजय यांचा शेवटचा आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'जन नायगन' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Jana Nayagan Release Date: तमिळ चित्रपटसृष्टीतील महासुपरस्टार जोसेफ विजय यांनी राजकारणात ऐतिहासिक पाऊल टाकत तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. १० मे रोजी चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये एका भव्य सोहळ्यात त्यांनी शपथ घेतली. विजय यांच्या या राजकीय प्रवासासोबतच आता त्यांच्या चाहत्यांसाठी सिनेसृष्टीतूनही एक आनंदाची बातमी समोर आली आहे. विजय यांचा शेवटचा आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'जन नायगन' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित असलेल्या केव्हीएन (KVN) प्रॉडक्शन्सचे संस्थापक व्यंकट के. नारायण यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत महत्त्वाची माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "चित्रपटासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) अंतिम प्रक्रिया सुरू आहे. आम्ही सेन्सॉर बोर्डाशी चर्चा करत आहोत आणि साधारणपणे पुढील १४ दिवसांत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे".


जोसेफ विजय यांनी राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होण्यासाठी 'जना नायकन' हा आपला शेवटचा चित्रपट असल्याचे जाहीर केले होते. आता ते राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. "आम्ही खूप आनंदी आणि उत्साहित आहोत" अशा भावना निर्मात्यांनी यावेळी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत विजय यांचा चित्रपट पडद्यावर येणार असल्याने चाहत्यांचे  उत्सवाचे वातावरण आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Chief Minister Thalapathy Vijay's 'Jana Nayagan' Ready; Producers Announce Update

Web Summary : After becoming Tamil Nadu's Chief Minister, Joseph Vijay's last film 'Jana Nayagan' is set for release. Producers anticipate its release within two weeks, pending censor board approval. Fans are excited for Vijay's film after his political entry.
टॅग्स :थलपती विजयतामिळनाडू