Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाचा 'मराठी मुलगी' अवतार; संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:18 IST

नुकताच सोशल मीडियावर 'डान्सिंग क्वीन' श्रीलीलाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) तिच्या अभिनयासह, निखळ सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे. 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं 'पुष्पा २' चित्रपटातील 'किसिक' (KissIk) हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. तिच्या नृत्याचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. सध्या श्रीलीला सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. नुकतंच तिचा पवन कल्याणसोबतच्या 'उस्ताद भगत सिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता तिने आपल्या एका खास रीलने मराठी चाहत्यांची मने जिंकली आहेत. श्रीलीला चक्क मराठमोळ्या रूपात संजू राठोडच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

श्रीलीलाने नुकतीच एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये ती अस्सल मराठी लूकमध्ये पाहायला मिळत आहे. भगव्या रंगाची नऊवारी पैठणी साडी, मोकळे केस, दागिने, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा तिचा सुंदर साज प्रेक्षकांना घायाळ करत आहे. विशेष म्हणजे, श्रीलीलानं लोकप्रिय गायक संजू राठोड याच्या 'शेकी शेकी' या गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या या व्हिडीओला तिने "मराठी मुलगी एनर्जी" असे कॅप्शन दिले आहे.

संजू राठोडची कमेंटश्रीलीलाच्या या अदांवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. खुद्द संजू राठोडने देखील तिच्या रीलवर कमेंट करत "हाये... किती सुंदर!" असे लिहून तिचे कौतुक केले आहे. यापूर्वीही श्रीलीलाने 'तांबडी चामडी' या मराठी रॅप साँगवर रील बनवली होती, जी प्रचंड व्हायरल झाली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sreeleela's Marathi avatar wins hearts; Sanju Rathod reacts.

Web Summary : South Indian actress Sreeleela charmed Marathi fans with a reel in traditional attire, dancing to Sanju Rathod's song. Rathod praised her look. This isn't her first Marathi reel; she previously danced to a Marathi rap song.
टॅग्स :सेलिब्रिटी