Join us

प्रसिद्ध अभिनेता होणार बाबा; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, म्हणाला- "आयुष्यातील सगळ्यात सुंदर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:02 IST

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेका वरुण तेज हा त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतो.

Varun Tej Post: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेका वरुण तेज हा त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असतो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने चित्रपटसृष्टीत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी लग्न केलं. इटलीमध्ये हिंदू पद्धतीने मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता लग्नाच्या दोन वर्षानंतर वरुण तेजने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. लवकरच अभिनेत्याच्या घरी पाळणार हलणार आहे. त्याची पत्नी लावण्या गरोदर असून ते दोघेही लवकरच आई-बाबा होणार आहेत.

नुकतीच वरुण तेजने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. "आयुष्यातील सर्वात सुंदर भूमिका - लवकरच येत आहे..." असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान वरुण तेज आणि त्याची पत्नी लावण्या यांनी २०२३ साली विवाहबद्ध होत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता लग्नाच्या दीड वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याने दोघेही खूश आहेत.वरुण आणि लावण्याच्या लग्नात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. सुपरस्टार चिरंजीवी, अल्लू अर्जुन, राम चरण वरुण-लावण्याच्या लग्नासाठी उपस्थित होते. वरुण हा चिरंजीवी यांचा भाचा आहे. तर अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्याबरोबरच त्याचे कौटुंबिक संबंध आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्