Join us  

नागा चैतन्यने खरेदी केली ब्रँड Porsche 911 कार, किंमत आहे कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 2:38 PM

नागा चैतन्यने ब्रँड नवीन Porsche 911 GT3 RS ही कार खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नागाचैतन्यने त्याच्या नवीन गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

नागा चैतन्य हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. नागा चैतन्य हा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकार नागार्जुन यांचा मुलगा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. नागा चैतन्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत असतो. आतादेखील नवीन कार खरेदी केल्यामुळे तो चर्चेत आला आहे. 

नागा चैतन्यने ब्रँड नवीन Porsche 911 GT3 RS ही कार खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नागाचैतन्यने त्याच्या नवीन गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. "पोर्श कुटुंबात अक्किनेनी नागा चैतन्यचं स्वागत आहे. Porsche 911 GT3 RS ही कार त्यांना सुपूर्द करताना आनंद होत होता. याबरोबर त्यांच्या अनेक चांगल्या आठवणी निर्माण होवोत", असं म्हणत पोर्श कंपनीनेही नागा चैतन्यचं अभिनंदन केलं आहे. चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

लक्झरियस आयुष्य जगणारा नागा चैतन्य महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे फेरारी, रेंज रोव्हर डिफेंडर ११० या आलिशान गाड्या आहेत. याशिवाय BMW मर्सिडीज या ब्रँड कारही त्याच्याकडे आहेत. आता त्याच्या ताफ्यात Porsche 911 ही जवळपास ३.५ कोटींची कार समाविष्ट झाली आहे. 

दरम्यान, नागा चैतन्य त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. २०१७ मध्ये त्याने समांथा रुथ प्रभूशी विवाह करत संसार थाटला होता. नागा चैतन्य आणि समांथा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल होते. पण काही कारणांमुळे अवघ्या ४ वर्षांतच घटस्फोट घेत ते वेगळे झाले. आता नागा चैतन्य लवकरच 'थंडैल' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो साई पल्लवीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी