दक्षिण भारतातील राजकारणी असो की, गँगस्टर या भुमिकांमध्ये एकच नाव येते ते म्हणजे कोटा श्रीनिवास राव यांचे. दिग्गज कलाकार कोटा श्रीनिवास राव यांचे आज ८३ व्या वर्षी निधन झाले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने तेलगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला.
राव यांनी दोन दिवसांपूर्वीच ८३ वा वाढदिवस साजरा केला होता. कोटा श्रीनिवास राव यांचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांचे चाहते खूप चिंतेत पडले होते. या फोटोमध्ये दिवंगत अभिनेत्याच्या एका पायावर पट्टी बांधलेली होती आणि दुसऱ्या पायावरही जखमांच्या खुणा होत्या.
जवळपास ७५० सिनेमे नावावर...
कोटा श्रीनिवास राव हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते. त्यांनी १९७८ मध्ये 'प्रणम खारीदू' या चित्रपटातून पदार्पण केले. ४० वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी ७५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९९९ ते २००४ पर्यंत ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा पूर्वेचे आमदारही होते. दम्मू', 'सन ऑफ सत्यमूर्ती' आणि 'डेंजरस खिलाडी' हे त्यांच्या गाजलेल्या भुमिकांपैकी काही चित्रपट आहेत.