Join us

पती विग्नेशसोबतच्या घटस्फोटाच्या वृत्तावर नयनतारानं सोडलं मौन, सोशल मीडियावर दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:04 IST

साउथ सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

साउथ सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून, ती तिचा पती विघ्नेश शिवन(Vighnesh Shivan)ला घटस्फोट देऊन त्याच्यापासून वेगळी होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अभिनेत्रीने स्वतः या वृत्तांवर मौन सोडले आणि अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

खरेतर, काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बनावट स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नयनतारा तिच्या लग्नाला मोठी चूक म्हणत असल्याचे दिसून आले. तेव्हापासून, तिच्या लग्नात समस्या निर्माण झाल्याच्या बातम्या पसरू लागल्या आणि अभिनेत्री तिचा पती विघ्नेशला घटस्फोट देणार आहे. आता नयनतारा यांनी या अफवांना उत्तर म्हणून एक पोस्ट शेअर केली आहे. नयनताराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती पती विघ्नेशसोबत दिसली आणि दोघेही विचित्र आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया देताना दिसले. हे शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''आमची प्रतिक्रिया... जेव्हा आपण स्वतःबद्दल विचित्र बातम्या पाहतो..''

नयनतारा आणि विघ्नेश आहेत दोन मुलांचे पालकनयनताराने २०२२ मध्ये विघ्नेश शिवनशी लग्न केले. लग्नानंतर हे जोडपे जुळ्या मुलांचे पालक बनले. कामासोबतच दोघेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. जिथे ते अनेकदा मुलांसोबत सण आणि सुट्टीचे फोटो शेअर करतात. चाहतेही या फोटोंवर खूप प्रेम करतात.

नयनतारानं केलंय बॉलिवूडमध्येही काम नयनतारा हे केवळ दक्षिण चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

टॅग्स :नयनतारा