Join us

Waves समिटमध्ये बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री, लग्नानंतर पाच महिन्यात गरोदर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 10:51 IST

नागा चैतन्य आणि शोभिताचा व्हिडिओ व्हायरल

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) यांनी नुकतीच waves परिषदेला हजेरी लावली. या स्टार कपलच्या एन्ट्रीवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.  गेल्या वर्षीच डिसेंबर महिन्यात शोभिता आणि नागाने पारंपरिक पद्धतीने थाटात लग्न केलं. नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न असल्याने याची खूप चर्चाही झाली. तर आता शोभिता लग्नानंतर पाच महिन्यात गरोदर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. waves summit मध्ये ती बेबी बंप लपवत असल्याची चर्चा झाली.

मुंबईत १ मे पासून waves परिषदेला सुरुवात झाली. भारतीय सिनेमातील अनेक दिग्गजांनी परिषदेला हजेरी लावली. काल तिसऱ्या दिवशी नागा चैतन्य पत्नी शोभितासह परिषदेत पोहोचला. शोभिताने कॉफी रंगाच्या डिझायनर साडीत अतिशय सुंदर लूक केला होता. केसांचा अंबाडा बांधून तिने छान गजरा माळला होता. गळ्यात वजनदार हारही होता. तिच्या रॉयल लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. यावेळी शोभिता तिच्या साडीचा पदर पुढे घेत बेबी बंप लपवत असल्याच्या कमेंट्स अनेकांनी केल्या. यामुळे शोभिता लग्नानंतर पाच महिन्यात प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली.

समोर आलं सत्य

नागा आणि शोभिता आईबाबा होणार असून ते लवकरच याची घोषणा करणार अशा चर्चा झाल्या. मात्र या अफवा असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यानेच माध्यमांना यावर स्पष्टीकरण दिलं. शोभिता गरोदर नाही. तिने अँटी फिट कपडे घातले होते. यामुळे लगेच या चर्चा होऊन वेगवेगळ्या गोष्टी बनतात हे फारच शॉकिंग आहे.

 

टॅग्स :Tollywoodप्रेग्नंसीव्हायरल व्हिडिओमुंबई