Join us  

रजनीकांतच्या 'थलायवर' मध्ये किंग खानची एन्ट्री, आणखी दोन सुपरस्टार्सही झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:15 AM

२२ एप्रिलला टीझर रिलीज होणार असून चाहत्यांना हे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.

थलायवा रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) एकत्र आले तर काय धमाल येईल ना? हे खरंच घडणार आहे. रजनीकांतच्या आगामी 'थलायवर 171' सिनेमातशाहरुख खानचीही एन्ट्री झाली आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराजने यामध्ये मोहन, विजय सेतुपति यांनाही समाविष्ट केलं आहे. २२ एप्रिलला टीझर रिलीज होणार असून चाहत्यांना हे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.

रजनीकांत आणि लोकेश कनगराज यांचा 'थलायवर 171' सिनेमाचं शूट पूर्ण होण्याच्या तयारित आहे. सिनेमाचं टायटल थलायवर 171 नसून वेगळं असणार आहे. टायटलवर अजूनही विचार सुरु आहे. चाहत्यांचं सिनेमाचं नाव आणि टीझर याकडे लक्ष लागलं आहे. प्री प्रोडक्शनचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. रजनीकांत आणि लोकेश दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. डीटी नेक्स्ट रिपोर्टनुसार, मोहन, विजय सेतुपति आणि शाहरुख खान 'थलायवर 171'चा भाग असणार आहेत. GOAT सिनेमात मोहन आणि विजय एकत्र दिसले होते. आता या सिनेमात मोहन रजनीकांत यांचा शत्रू असणार आहे. विजय सेतुपति आणि रजनीकांत यांनी 'पेट्टा' सिनेमात एकत्र काम केलं होतं. आता तो या सिनेमात चांगली भूमिका निभावणार आहे. 

थलायवर 171 मध्ये शाहरुख खानचीही मुख्य भूमिका आहे. या सिनेमात तो कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. यामुळे आता चाहते आणखी आतुर झाले आहेत. सर्वांनाच २२ तारखेची प्रतिक्षा आहे. टीझरबाबत आणखी माहिती लवकरच समोर येणार आहे. 

टॅग्स :रजनीकांतशाहरुख खानTollywoodसिनेमा