Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पुरुषांनी एकदा तरी मासिक पाळीचा अनुभव घ्यायला हवा, म्हणजे..." रश्मिका मंदाना काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:23 IST

रश्मिका मंदाना तिच्या मासिक पाळीसंदर्भात केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. 

रश्मिका मंदाना सध्या हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आघाडीवर आहे. बऱ्याच सिनेमांमध्ये रश्मिकाला मुख्य अभिनेत्री म्हणून पसंती मिळते. त्यामुळे तिचा भाव चांगलाच वधारला आहे. नुकताच तिचा 'थामा' रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तसेच तिचा 'द गर्लफ्रेंड'देखील प्रेक्षकांना आवडला आहे. अशातच रश्मिका मंदाना तिच्या मासिक पाळीसंदर्भात केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. 

जगपति बाबूंच्या टॉक शोमध्ये रश्मिकानं म्हटलं की पुरुषांनाही एकदा तरी मासिक पाळीचा अनुभव असावा, जेणेकरून महिलांनी किती वेदना होतात, हे त्यांना कळेल. तिच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी समर्थन केले तर काहींनी तिचा विरोध केला. यानंतर तिच्या एका चाहत्यानं रश्मिकाची बाजू घेत एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टवर कमेंट करत रश्मिकानं स्वतःचं मत स्पष्ट केलं. ती म्हणाली, "याबद्दल कुणीही बोलणार नाही.. शो आणि इंटरव्यूमध्ये येण्याबद्दलची मला जी भीती वाटते, ती अशा गोष्टींमुळेच. माझा हेतू काही वेगळा असतो आणि त्याच वेगळाच अर्थ काढला जातो". 

नेमकं काय म्हणाली होती रश्मिका?

"पुरुषांनी कमीतकमी एकदा तरी मासिक पाळीचा अनुभव घ्यायला हवा, जेणेकरून त्यांना त्या वेदना आणि त्रास समजेल. हार्मोनल असंतुलनामुळे आम्ही अशा भावना अनुभवतो ज्यांना  इतर कोणी समजू शकत नाही. कितीही समजावलं तरी ते त्या अनुभवाला पूर्णपणे समजू शकत नाहीत. म्हणून, जर पुरुषांना फक्त एकदा मासिक पाळी अनुभवायला मिळाली, तर त्यांना समजेल की मासिक पाळीचा वेदना काय असतात". तिने पुढे सांगितले, "माझ्या मासिक पाळीच्या वेदना इतक्या भयानक असतात की एकदा यामुळे मी चक्कर येऊन पडले होते. मी अनेक टेस्ट्स करून घेतल्या आहेत आणि डॉक्टरांचा सल्लाही घेतला आहे, पण कुणालाच माहित नाही की हा त्रास का होतो. प्रत्येक महिन्याला मी विचार करते, 'हे देवा, तुम्ही मला एवढं का त्रास देत आहात?' मला वाटतं की हे अनुभव घेतल्याशिवाय कोणी समजू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की पुरुषांना कमीतकमी एकदा तरी मासिक पाळी अनुभवायला हवी".

रश्मिकाचं लग्न कधी?

दरम्यान, रश्मिका मंदाना अनेक वर्षांपासून विजय देवरकोंडाला डेट करत आहे. दोघांची जोडी 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड'मध्ये एकत्र दिसली होती. तिथूनच त्यांच्या केमिस्ट्रीला सुरुवात झाली. लवकरच दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांनी साखरपूडा उरकल्याचंही बोललं जातं. ते कधी लग्न करणार यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika Mandanna: Men should experience menstruation once to understand women's pain.

Web Summary : Rashmika Mandanna suggests men experience menstruation to understand women's pain. Facing mixed reactions, she clarified her intent was empathy, not comparison. She also addressed rumors of her upcoming marriage with Vijay Deverakonda.
टॅग्स :रश्मिका मंदाना