Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र ठरतंय चर्चेचा विषय; हिरे-माणिक सोडून अभिनेत्रीनं जपली परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:59 IST

विजय आणि रश्मिकाची प्रेमकहाणी 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती.

Rashmika Mandanna Mangalsutra : दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.  हा विवाहसोहळा जितका भव्य होता, तितकीच चर्चा रश्मिकाच्या दागिन्यांची होत आहे. विशेषतः रश्मिकाच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री सहसा हिऱ्यांनी जडलेली किंवा महागड्या डिझायनर मंगळसूत्रांना पसंती देतात. मात्र, रश्मिकाने दाक्षिणात्य परंपरेनुसार 'पिवळ्या धाग्यात गुंफलेले काळे मोती' असलेले मंगळसूत्र परिधान केलं. दाक्षिणात्य संस्कृतीत या साध्या पण पवित्र धाग्याला विशेष महत्त्व आहे. 

विजय-रश्मिकाच्या डोळ्यांत आनंदाश्रूलग्नाच्या फोटोंमध्ये एक अत्यंत भावूक क्षण कैद झाला आहे.जेव्हा विजय देवरकोंडा रश्मिकाच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालत होता. यावेळी विजय आणि रश्मिका या दोघांचेही डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपल्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला पत्नी म्हणून स्वीकारतानाचा हा क्षण त्यांच्यातील अतूट प्रेमाची साक्ष देणार ठरला.

'गीता गोविंदम' ते रिअल लाईफ कपलविजय आणि रश्मिकाची प्रेमकहाणी 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. तब्बल सहा वर्षे हे नाते जगापासून लपवून ठेवल्यानंतर, अखेर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. हे लग्न अत्यंत खाजगी स्वरूपाचे होते. अत्यंत साध्या पद्धतीनं, शांततेत हा विवाह सोहळा पार पडला.  आता लग्नानंतर विजय आणि रश्मिका हैदराबादमध्ये ४ मार्च रोजी ग्रँड रिसेप्शन देणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashmika Mandanna's traditional mangalsutra sparks discussion, embraces heritage over diamonds.

Web Summary : Rashmika Mandanna's wedding to Vijay Deverakonda is creating buzz, especially her traditional mangalsutra. Eschewing diamonds, she chose a simple black beads and yellow thread necklace, significant in South Indian culture. Their emotional wedding photos reveal deep love.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडा