दाक्षिणात्य सिनेविश्वातील सर्वांत लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या एका खास सेलिब्रेशनमुळे चर्चेत आहेत. काल ९ मे रोजी विजयने आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा विजयचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने रश्मिकाने हा दिवस अतिशय खास बनवला. याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रश्मिकाने विजयच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अतिशय साधेपणाने आणि कुटुंबासोबत साजरे केले. रश्मिकाने पोस्टमध्ये लिहिले की, "आज माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आणि तो आम्ही असा साजरा केला. रात्री एका मित्राच्या घरी गेलो, पण त्यापूर्वी आम्ही एकत्र जिममध्ये गेलो. व्यायाम आणि कार्डिओ केलं. विज्जू एका मीटिंगसाठी बाहेर जाण्यापूर्वी, विज्जूवर भरभरून प्रेम व्यक्त करण्यासाठी घरी आलेल्या मित्र-मैत्रिणींना आम्ही भेटलो आणि त्या निमित्ताने मलाही त्यांच्याकडून खूप प्रेम मिळाले".
पुढे सांगितलं, "आम्ही 'पापालू डॅड' आणि विज्जूच्या वाढदिवसासाठी इथे आलेल्या 'शिम्मू'ला गुड मॉर्निंग केले. थोडक्यात सांगायचं तर, आजचा दिवस अगदी परिपूर्ण ठरला. शूटिंगची तारीख जाहीर झाली असताना, काही कारणास्तव ते रद्द व्हावं आणि मग आपल्याला हा आनंद साजरा करता यावा; असे क्षण मला खूप आवडतात. माझ्या विज्जूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा", असं म्हणत तिनं नवऱ्यावरील प्रेम व्यक्त केलं.
विजयला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांचा महापूर लोटला होता. विजयनं चाहत्यांनी आणलेला खास 'राणाबाली-थीम' असलेला केक कापला. यावेळी रश्मिका लाडक्या पतीचे हे खास क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसली. रश्मिका आणि विजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर हे दोघे 'राणाबाली' या बहुप्रतीक्षित पॅन-इंडिया ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. माहितीनुसार ११ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : Rashmika Mandanna celebrated Vijay Deverakonda's 37th birthday simply with family. She shared photos, mentioning gym visits, friends, and morning greetings with her pet. The couple will appear in 'RaanaBali'.
Web Summary : रश्मिका मंदाना ने विजय देवरकोंडा का 37वां जन्मदिन परिवार के साथ सादगी से मनाया। उन्होंने तस्वीरें साझा कीं, जिसमें जिम जाना, दोस्त और अपने पालतू जानवर के साथ सुबह की नमस्ते शामिल थी। ये जोड़ी 'राणाबली' में दिखेगी।