राम चरणचा 'पेड्डी' सिनेमा २०२६ मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. जान्हवी कपूर आणि जगपति बाबू यांसारख्या दमदार कलाकारांसह, पोस्टर्सपासून गाण्यांपर्यंत प्रत्येक अपडेटने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. निर्मात्यांनी आता एक दमदार नवीन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. ४ जूनला प्रदर्शित होणाऱ्या पेड्डी सिनेमाला आता अवघे ३० दिवस बाकी उरले आहेत.
या सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये राम चरण हातात बिडी घेऊन निवांत बसल्याचं दिसत आहे. चित्रपटातील त्याच्या या नव्या लूकची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. या पोस्टरवर सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी ३० दिवस बाकी असल्याचं म्हटलं आहे. 'पेड्डी' सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांना भुरळ पडली आहे. चित्रपटातील पहिले गाणे "चिकिरी चिकिरी" ए. आर. रहमान यांच्या खास टचसह प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. या गाण्याने सर्व प्लॅटफॉर्म्सवर २०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर "राई राई रा रा" या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील हाय-एनर्जी बीट्स आणि उत्कृष्ट कोरिओग्राफीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या गाण्याने यूट्यूबवर ६५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला असून, 'पेड्डी'बद्दलची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
बुची बाबू साना लिखित आणि दिग्दर्शित 'पेड्डी'मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत शिवा राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदु शर्मा आणि जगपति बाबू देखील दिसणार आहेत. वेंकट सतीश किलारू यांनी 'वृद्धि सिनेमाज'च्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे आणि 'माइथ्री मूवी मेकर्स'च्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला आहे. हा चित्रपट ४ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : Ram Charan's 'Peddi', co-starring Janhvi Kapoor, unveils a striking poster, intensifying anticipation. With 30 days remaining until release, the film's songs are already hits, boosting excitement for the June 4, 2026 premiere.
Web Summary : राम चरण की 'पेड्डी', जिसमें जान्हवी कपूर भी हैं, का शानदार पोस्टर जारी, प्रत्याशा तीव्र हुई। रिलीज से 30 दिन पहले, फिल्म के गाने पहले से ही हिट हैं, जिससे 4 जून, 2026 के प्रीमियर के लिए उत्साह बढ़ गया है।