Join us  

Video : थलायवा रजनीकांतच्या चाहत्यांचा धुमाकूळ, Jailer रिलीज होताच थिएटरबाहेर जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 12:37 PM

रजनीकांतच्या चाहत्यांचं थिएटरबाहेर जोरदार सेलिब्रेशन

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) याची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. दाक्षिणात्या सुपरस्टार ज्याला तेथील लोक अक्षरश: देव मानतात त्याचा नवाकोरा सिनेमा आज रिलीज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून रजनीकांतच्या 'जेलर' (Jailer) सिनेमाची उत्सुकता होती तो आज प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चाहत्यांनी थिएटरमध्ये धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय. रजनीकांतचा सिनेमा म्हणजे तिथल्या लोकांसाठी एखाद्या सणाहून कमी नाही. आज तमिळनाडूत ठिकठिकाणी जल्लोष सुरु आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'जेलर' सिनेमाची उत्सुकता प्रचंड ताणली होती. नेल्सन दिलीप कुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तमिळ भाषेतील हा सिनेमा इतर भाषेतील रिलीज झालाय. रजनीकांतचा सिनेमा म्हणजे एक उत्सवच त्यामुळे चेन्नई आणि बंगळुरुत कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे जेलरच्या रिलीजचं सेलिब्रेशन सुरु आहे. रजनीकांतचे फॅन फक्त भारतातच नाही तर देशाबाहेरही आहेत. एक जपानी कपल केवळ रजनीकांतचा सिनेमा बघण्यासाठी चेन्नईत आले आहेत. त्यामुळे रजनीकांतच्या चाहत्यांना कोणीत आव्हान देऊ शकत नाही एवढा मोठा त्याचा चाहतावर्ग आहे.

'जेलर' ब्लॅक कॉमेडी अॅक्शन फिल्म आहे. ट्रेड अॅनालिस्टनुसार, पहिल्याच दिवशी सिनेमाने ४० ते ४५ कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. भारतात पहिल्या चारच दिवसात सिनेमा १०० कोटी गाठू शकेल.आता सिनेमा खरंच किती यश मिळवतो हे काहीच दिवसात स्पष्ट होईल. जेलरमध्ये रजनीकांतसोबतच राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, योगी बाबू, जॅकी श्रॉफ, मोहनलाल, विनायकन यांच्याही भूमिका आहेत.

टॅग्स :रजनीकांतसिनेमाचेन्नईसोशल मीडिया