Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्लू अर्जूनच्या जवळ येत नव्हती त्याची 8 वर्षांची मुलगी, लेकीबद्दल बोलताना अभिनेता भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 13:07 IST

अल्लू अर्जून त्याच्या मुलीबद्दल बोलताना थोडा भावुक झाला. 

Allu Arjun Daughter: सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'पुष्पा 2: द रुल' सिनेमा चर्चेत आहे. हा मोस्ट अवेटेड चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत.  फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. निर्मात्यांनी रिलीजच्या काही दिवस आधी चित्रपटाचे अंतिम शूटिंग पूर्ण केले. 'पुष्पा 2'  फायनल शूट पूर्ण झाल्यामुळे सगळेच खूश आहेत, पण सर्वात जास्त आनंदी आहे तो अल्लू अर्जुन. नुकतंच अल्लू अर्जुन आणि रश्मिका 'पुष्पा 2' च्या प्रमोशनसाठी मुंबईत पोहोचले. यावेळी अल्लू अर्जून त्याच्या मुलीबद्दल बोलताना थोडा भावूक झाला. 

'पुष्पा २' च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुन सिनेमाच्या पाच वर्षांच्या भावनिक प्रवासाबद्दल भरभरुन बोलला. यावेळी त्याने सांगितले की चित्रपटाचे शूटिंग लवकर संपण्याची आणि क्लीन शेव्ह करण्याची इच्छा होती. त्याच्या या इच्छेमागी कारण त्याची मुलगी होती. अल्लू अर्जून म्हणाला, "सिनेमाचा पहिला आणि दुसरा भाग मी जवळपास पाच वर्षे शूट केला आहे. हा चित्रपट संपण्याची मी वाट पाहत होतो. कारण मला दाढी करायची होती. दाढी असल्यानं माझी मुलगी माझ्या जवळ येत नव्हती. मी तिचे लाड करु शकत नव्हतो.  माझी दाढी मोठी होती. गेल्या 3-4 वर्षांपासून मी माझ्या मुलीला प्रेमाने किस केले नाही".

अल्लू अर्जूनच्या मुलीचे नाव अरहा असं आहे. 'अरहा' नावाचा अर्थ "पूजा आणि आराधना" असा आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. अरहावर अल्लू अर्जूनचं खूप प्रेम आहे. याशिवाय अर्जूनला एक मुलगादेखील आहे. त्याचे नाव अयान असं आहे. तर अल्लू अर्जूनच्या पत्नीचं नाव स्नेहा रेड्डी असं आहे. स्नेहा आणि अर्जून यांनी 6 मार्च 2011मध्ये लग्नगाठ बांधली होती. स्नेहादेखील सोशल मीडियावर सक्रीय असते. 

टॅग्स :अल्लू अर्जुन