Join us
Daily Top 2Weekly Top 5

देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 20:36 IST

एस.एस. राजामौलींच्या 'ग्लोबट्रोटर'मधील प्रियंका चोप्राचा पहिला लूक पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

Priyanka Chopra’s FIRST Look from GlobeTrotter Out: 'बाहुबली' आणि 'RRR' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) आणि सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांच्या बहुप्रतिक्षित 'ग्लोबट्रोटर' (Globetrotter) अर्थात SSMB29 चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या ग्लोबल ॲडव्हेंचर चित्रपटात महत्त्वाची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासचा (Priyanka Chopra Jonas) धमाकेदार फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. तिचा हा दमदार लूक पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसलाय.

'ग्लोबट्रोटर' चित्रपटात प्रियंका चोप्रा ही 'मंदाकिनी' (Mandakini) नावाची भुमिका साकारत आहे. नुकत्याच समोर आलेल्या तिच्या फर्स्ट लूकमध्ये प्रियंका एका पिवळ्या साडीत दिसतेय. तिच्या पारंपरिक लूकला एक जबरदस्त ॲक्शनचा टच आहे. पिवळ्या साडीत कहर दिसत असलेल्या प्रियंकाच्या हातात बंदूक आहे, जी तिने थेट शत्रूंवर रोखलेली दिसतेय. विशेष म्हणजे प्रियंकाच्या पायात कोल्हापूरी चप्पलदेखील पाहायला मिळतेय. 

राजामौली यांनी प्रियंकाचा हा लूक ट्विटवर शेअर केलाय. "ग्लोबल स्तरावर भारतीय सिनेमाला एक नवी ओळख देणाऱ्या 'देसी गर्ल'चं स्वागत आहे! मंदाकिनीच्या अनेक छटा जगानं पाहाव्यात, यासाठी मी उत्सुक आहे" अशा शब्दांत त्यांनी प्रियंकाचे कौतुक केले आहे. 

५० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने राजामौलींच्या सिनेमाची घोषणा होणार

'एसएसएमबी २९' हा चित्रपट एका जागतिक ॲक्शन-ॲडव्हेंचर कथेवर आधारित आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध 'इंडियाना जोन्स' मालिकेपासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट तयार केला जात आहे.  १५ नोव्हेंबर ला सिनेमाचं नाव आणि पहिली झलक समोर येणार आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये मोठ्या इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जवळपास ५०,००० चाहत्यांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. राजामौली आणि त्यांच्या सिनेमाची लोकप्रियता पाहता हे आयोजन केवळ देशात नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चर्चेत राहील, अशी अपेक्षा आहे.  प्रियंकाला या सिनेमात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra's 'Desi Girl' returns in 'Globetrotter' as Mandakini: First look stuns

Web Summary : Priyanka Chopra's first look as Mandakini in 'Globetrotter' is out. Directed by SS Rajamouli, she is seen in a saree with a gun. Rajamouli praised her return to Indian cinema.
टॅग्स :प्रियंका चोप्राएस.एस. राजमौलीमहेश बाबू