Join us

भिकाऱ्याने गोणीत भरलं अन् उचलून नेणार इतक्यात...; प्रसिद्ध गायिकेसोबत घडलेलं असं काही, फिल्मी आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:43 IST

भिकाऱ्याने गोणीत भरलं अन् उचलून नेणार इतक्यात...; प्रसिद्ध गायिकेसोबत घडलेलं काही, फिल्मी आहे किस्सा

South Singer rimi tomy : अपहरणाची अनेक प्रकरणं आपल्या कानावर येत असतात. असाच एक किस्सा सिनेविश्वातील प्रसिद्ध गायिकेसोबत घडला होता. लहानपणी या गायिकेला एका भिकाऱ्याने चक्क गोणीत भरून अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. या गायिकेचे नाव रिमी टॉमी आहे. तिच्यासोबत घडलेली ही घटना फिल्मीच आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये रिमी टॉमीने याबद्दल सांगितलं.

रिमी टॉमीचा जन्म केरळमधील कोटायम येथे झाला. तिने अगदी बालपणापासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू आपल्या आवाजाने तिला लोकप्रियता मिळाली. एका कार्यक्रमात दिग्दर्शक नादिर शाह यांची तिच्यावर नजर पडली आणि तिच्या करिअरला नवी दिशा मिळाली. मात्र, या गायिकेसोबत एक विचित्र घटना घडली होती. ज्यामुळे तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. रिमीचे वडील सैन्यात होते. लहानपणी तिला एका भिकाऱ्याने किडनॅप केलं होतं. एके दिवशी ती लहानपणी अंगणात खेळत असताना तेव्हा तिथे एक भिकारी आला. त्याने रिमीला विचारलं "तू माझ्यासोबत येशील का?" लहानग्या रिमीने लगेच होकार दिला. त्या क्षणी आपण कोणता धोका पत्करत आहे याची तिला जाणीव नव्हती."

त्यानंतर तिने सांगितलं की, हे सगळं घडलं तरी त्याबद्दल घरातील कोणालाही माहिती नव्हती. मात्र, त्यांच्या ओळखीतल्या एका माणसाने तिला भिकाऱ्यासोबत पाहिलं. तो भिकारी एका शेडमध्ये तिला नेऊन तिला गोणीत भरण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, त्या माणसाने ओळखलं की ही रिमी आहे. क्षणाचाही विलंब न करता त्याने लगेच तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्या भिकाऱ्यापासून तिची सुटका केली. असा किस्सा रिमीने स्वत: सांगितला.

गायनाबरोबर रिमी टॉमी अभिनयातही निपुण आहे. मीशा माधवन या चित्रपटातही तिने काम केलं आहे. त्याचबरोबर अनेक रिअॅलिटी शो तिनं होस्ट केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Singer Rimi Tomy's close call: Kidnapped as a child!

Web Summary : Singer Rimi Tomy revealed a childhood kidnapping attempt. A beggar tried to abduct her while she played, stuffing her in a sack. A passerby recognized and rescued her, preventing the abduction.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी