Join us

'महावतार नरसिंह'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:34 IST

नुकतंच या चित्रपटाचा एक नवा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.

'महावतार नृसिंह ' या पौराणिक चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. अश्विन कुमार दिग्दर्शित हा चित्रपट  नृसिंह जयंतीच्या दिवशी म्हणजेच २५ जुलै २०२५ प्रदर्शित होणार आहे.

नुकतंच या चित्रपटाचा एक नवा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये भव्य दृश्यांद्वारे एक महाकाव्यात्मक पौराणिक कहाणीचे उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आलं आहे.  या चित्रपटाचे निर्माते शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई आहेत. कलीम प्रोडक्शन्सच्या अंतर्गत त्यांनी हॉम्बले फिल्म्ससोबत मिळून हा चित्रपट तयार केला जा आहे. हा चित्रपट ३D फॉरमॅटमध्ये आणि पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

'महावतार' ही एक सिरीज आहे. ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या विविध अवतारांच्या कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.   'महावतार नरसिंह'  हा हॉम्बले फिल्म्सचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  या बॅनरने याआधी KGF Chapter 1 & 2, सालार: पार्ट 1 – सीजफायर, आणि कांतारा सारखे पॅन-इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

विष्णूच्या या अवताराची कथा.... 

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असून, वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला, अशी मान्यता आहे. भगवान विष्णूचा नृसिंह अवतार प्रकट झाला, म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते.

टॅग्स :सिनेमाTollywood