Join us  

प्रभास आणि चाहत्यांचे किस्से! बाहुबलीवर जीव ओवाळून टाकतात फॅन्स; 6000 मुलींनी केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 1:44 PM

बाहुबली चित्रपटानंतर 6 हजार मुलींनी प्रभासला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

साउथ स्टार प्रभास हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांचं तुफान फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्यावर लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात. एवढंच नाही तर चाहते त्याला आदर्श देखील मानतात. २३ ऑक्टोबर १९७९ मध्ये जन्मलेला प्रभास आज त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे.

'बाहुबली’ हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचरल आहे. बाहुबली चित्रपटानंतर 6 हजार मुलींनी त्याला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण प्रभासने कोणालाही होकार दिला नसून तो सिंगल आयुष्य जगत आहे.  चाहते प्रभासच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रभास लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली आहे. 

चाहत्यांमध्ये बाहुबलीची क्रेझ इतकी आहे जेव्हा-जेव्हा प्रभासचे चित्रपट प्रदर्शित होतात, तेव्हा संपुर्ण शहरात त्याचे पोस्टर लावले जातात आणि पोस्टरला दुधाचा अभिषेक केला जातो. बाहुबली चित्रपटानंतर तर अनेक चाहत्यांनी चेहऱ्यावर प्रभासचे टॅटू गोंदवले होते. एका रशियन चाहत्याने त्याच्या पाठीवर अमरेंद्र बाहुबलीचा मोठा टॅटू काढला होता. 

प्रभास हा केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याच्या अभिनयामुळं प्रसिद्ध झाला. विशेषत; तो बाहुबली पासून सर्वांच्या नजरेत भरला आहे. चाहते प्रभाससाठी जीव द्यायला पण मागेपुढे पाहत नाहीत. एका चाहत्याने तर प्रभासला भेटण्यासाठी मोबाईल टॉवरवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता.

शिवाय, प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर चित्रपट राधे श्याम 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोविडमुळे तो पुढे ढकलण्यात आला. अनेक महिन्यांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणतेही अपडेट न मिळाल्याने एका चाहत्याने वैतागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या चाहत्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती ज्यात त्याने निर्माते आणि स्टारकास्टला आत्महत्येचे कारण सांगितले होते. सुदैवाने हा चाहता वेळीच बचावला.

टॅग्स :प्रभासTollywoodसेलिब्रिटी