Join us
Daily Top 2Weekly Top 5

तृषाच्या हातावरील 'त्या' टॅटूचा अर्थ माहितेय का? थलापती विजय यांच्या राजकीय नशिबाशी जोडलं जातंय कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:33 IST

तृषाच्या हातावरील हा टॅटू नेमका कशाचा आहे आणि त्याचा मुख्यमंत्री विजय यांच्या नशिबाशी काय संबंध जोडला जातोय, याबद्दल जाणून घेऊया.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार थलापती विजय यांनी तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक पाऊल टाकत मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. विजय यांच्या या अभूतपूर्व यशाच्या जल्लोषात अभिनेत्री तृषा कृष्णन चर्चेत आली आहे. त्रिशाच्या हातावरील एका विशिष्ट टॅटूनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा केवळ एक टॅटू नसून, तो विजय यांच्या राजकीय प्रवासातील यशाचा 'शुभशकुन' ठरल्याचा दावा सध्या चाहत्यांकडून केला जात आहे.  हा टॅटू नेमका कशाचा आहे आणि त्याचा मुख्यमंत्री विजय यांच्या नशिबाशी काय संबंध जोडला जातोय, याबद्दल जाणून घेऊया.

न्यूज१८ कन्नडच्या वृत्तानुसार, तृषाच्या हातावरील हा टॅटू 'वृषभ' (Taurus) राशीशी संबंधित आहे. ही तृषाची स्वतःची राशी आहे. आपल्या आयुष्यातील यशात राशीचा मोठा वाटा असल्याचे तृषा मानते, म्हणूनच तिने हे चिन्ह आपल्या हातावर गोदवून घेतले आहे. सोशल मीडिया युजर्स आणि काही ज्योतिषांनी या टॅटूचा संबंध थेट मुख्यमंत्री विजय यांच्याशी जोडला आहे.

विजय यांची राशी 'कर्क' (Cancer) आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ आणि कर्क या राशी एकमेकांसाठी अत्यंत अनुकूल मानल्या जातात. अनेक चाहत्यांचा असा दावा आहे की,  तृषाने हा टॅटू काढल्यानंतर विजय यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली आणि त्यांना प्रचंड विजय मिळाला. ज्योतिषांच्या मते, या दोन राशींची जोडी स्थिरता आणि सकारात्मक बदलांचे प्रतीक मानली जाते. मात्र, या सर्व चर्चा आणि दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
 

टॅग्स :थलपती विजय