Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुपचूप साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्यने शोभिताशी केलं लग्न? अभिनेत्याच्या वरातीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:44 IST

साखरपुड्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिताने गुपचूप लग्न केल्याचंही बोललं जात आहे. नागा चैतन्यचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे त्याने शोभिताशी लग्न केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. 

साऊथस्टार नागा चैतन्य त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. त्यांचे साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. आता साखरपुड्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिताने गुपचूप लग्न केल्याचंही बोललं जात आहे. नागा चैतन्यचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे त्याने शोभिताशी लग्न केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. 

विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन नागा चैतन्यचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता एका विंटेज गाडीतून रॉयल एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे. या गाडीला फुलांनी सजावटही केली आहे. नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नातील हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. नागा चैतन्यचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे त्याने शोभिताशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

नागा चैतन्य आणि शोभिताने ८ ऑगस्टला गुपचूप साखरपुडा केला होता. नागार्जुन यांनी फोटो शेअर करत त्यांच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. नागा चैतन्य आणि शोभिताच्या रिलेशनशिपच्या चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. त्या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. पण, दोघांनीही याबाबत भाष्य करणं टाळलं होतं. अखेर साखरपुडा करत नागा चैतन्य आणि शोभिताने त्याचं रिलेशनशिप ऑफिशियल केलं. 

नागा चैतन्यने याआधी अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. काही वर्ष डेट केल्यानंतर २०१७मध्ये ते विवाहबंधनात अडकले होते. पण, अवघ्या काही वर्षांतच त्यांचा संसार मोडला. २०२१ मध्ये घटस्फोट घेत वेगळं झाल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी