Join us

प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भेटीला येतोय 'बाहुबली: द एपिक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 18:49 IST

प्रेक्षकांना पुन्हा एकदा जादुई अनुभव घेता येणार आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक एस.एस. राजमौली (S. S. Rajamouli) यांच्या 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या दोन्ही चित्रपटांनी इतिहास रचला होता. जगभरात लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबती यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट चांगलाच गाजला होता. अशातच आता 'बाहुबली'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास १० वर्षानंतर प्रेक्षकांना पुन्हा हा जादुई अनुभव घेता येणार आहे.

१० वर्षांपूर्वी याच एस.एस. राजामौली यांनी बाहुबली फ्रँचायझी लाँच केली होती. आता चित्रपटाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभासने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. बाहुबलीच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाची कथा आता 'बाहुबली: द एपिक' या एकाच चित्रपटाद्वारे पुन्हा ३१ ऑक्टोंबर २०१५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जात आहे. प्रेक्षकांना बाहुबलीची कथा कोणत्याही ब्रेकशिवाय एकत्र पाहण्याचा एक नवीन अनुभव मिळणार आहे.

प्रभासच्या कामाबद्दल बोलायचं झालं गेल्यावर्षी अभिनेता 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला होता. आता आता 'कल्कि 2898 एडी'नंतर प्रभास ''द राजासाब'' (The RajaSaab Movie) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  'द राजा साब' सिनेमा ५ डिसेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :प्रभाससिनेमा